file Photo
file Photo 
विदर्भ

रोहित पक्ष्यांच्या संरक्षणास पक्षिप्रेमी सरसावले 

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) ः समुद्रपूर तालुक्‍यातील पोथरा धरण परिसरात वास्तव्यास आलेल्या रोहित पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पक्षीप्रेमी सरसावले आहेत. हिंगणघाट येथील पक्षिप्रेमींनी प्रवीण कडू यांच्या नेतृत्वात धरण परिसरातील पाण्याच्या काठावर जाळे शोधण्याची शोध मोहीम हाती घेतली आहे. 
धरण परिसरात कोळी मासेमारी करण्याकरिता नेहमी जाळे टाकून ठेवतात. यावेळी येथे अनेक पक्षीसुद्धा मासे व शेवाळवर्गीय वनस्पती खाण्यासाठी, शिकारीसाठी किंवा पाण्यात विहार करण्याकरिता येत असतात. असे पक्षी किनाऱ्यावर आल्यानंतर अलगद जाळ्यात अडकतात. अलीकडे अनेक पक्ष्यांसोबत रोहित पक्षीही येथे येत आहेत. जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांची काही मासेमार पैशाच्या लालसेपोटी विक्री करतात. 
यापूर्वी याच पाणवठ्यावर राजहंस या दुर्मिळ पक्ष्याची शिकार करण्याचे प्रकरण पक्षीप्रेमी प्रवीण कडू यांनी उघडकीस आणले होते. याच पार्श्‍वभूमीवर रोहित पक्ष्याची शिकार होण्याची भीती नाकारता येत नाही. ही शक्‍यता पाहता पक्षीप्रेमींनी विशेष दक्षता घेत निंभा येथे मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कवडूजी सहारे यांची भेट घेतली. यावेळी प्रवीण कडू यांच्यासह अभिजित डाखोरे, नितीन सिंगरू, आशीष भोयर यांनी पक्ष्यांना शिकारीपासून संरक्षण देण्याकरिता साकडे घातले. श्री. सहारे यांनीसुद्धा यासाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.
रोहित पक्ष्यांचे संरक्षण आवश्‍यक 
रोहित हा पाणपक्षी अत्यंत देखणा, ऐटदार असतो. त्याची चोच ही त्याचे वैशिष्ट्य आहे. मोठी चोच मध्यावर मोडल्यागत वाकलेली असते. या चोचीचा वापर ते चिखलातून भक्ष्य गाळून घेण्याकरिता चाळणीसारखा करतात. या वैशिष्ट्यामुळे हा पक्षी इतरांपेक्षा वेगळा ठरतो. तसेच आकाशात उडताना, वळण घेताना हा पक्षी अत्यंत सुंदर व देखणा दिसतो. म्हणूनच याला "अग्निपंख' म्हणून संबोधतात, अशी माहिती प्रवीण कडू यांनी दिली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT