BJP 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : 'या' जिल्ह्यात भाजपची अपक्षांविरोधातच लढाई

अभिजीत घोरमारे

भंडारा : भाजप उमेदवारला कार्यकर्ते सापडेना तर अपक्ष उमेदवारांचे असंख्य कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन अशी परिस्थिती भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात भाजप विरुद्ध अपक्ष अशी स्थिती पाहायला मिळत आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने ऐनवेळी पक्षाची तिकीट मिळाल्याने सर्व पक्षाची गडबड झालेली पाहायला मिळाली. जिल्ह्यातील तिन्ही विद्यमान आमदारांची तिकीटे कापल्याने पक्षाच्या तुलनेत अपक्षांचाच बोलबाला जास्आत पाहायला मिळाला.

भंडारा-पवनी विधानसभेसाठी भाजप-शिवसेना रिपाईचे उमेदवार अरविंद भालाधरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून पक्षाचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या नेत्यांनी व त्यांच्या समर्थकनी भाजप रॅलीला पाठ फिरवली. त्यामुळे भाजप उमेदवाराला कार्यकर्ता मिळेना झाला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दूसरीकडे अपक्ष उमेदवार शिवसेना जिल्हाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या हजारों समर्थकांसह भंडारा पवनी विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. 

मोहाडी तुमसर विधानसभेचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना डावलुन भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोले यांना तिकीट मिळाल्याने नाराज आमदार चरण वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दूसरीकडे साकोली विधानसभेचे विद्यमान आमदार बाला उर्फ राजेश काशीवार यांचे भाजपने तिकीट कापले असून राज्यमंत्री परिणय फुके यांना साकोली विधान सभेची उमदेवारी दिली आहे. त्यामुळे काशिवार यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे. आता जिल्ह्यात भाजप विरुद्ध अपक्ष अशी स्थिति पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT