अरुण पोटभरे
अरुण पोटभरे 
विदर्भ

कामठी येथे भाजप पदाधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कामठी : भरधाव मल्टिएक्‍सेल (चौदा चाकी ट्रक) वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कामठी येथे नागपूर-जबलपूर महामार्गावरील स्टेट बॅंकेजवळ शुक्रवारी दुपारी घडली. अरुण पोटभरे (वय 38, रा. येरखेडा, कामठी) असे मृताचे नाव आहे. ते येरखेडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व भाजयुमोचे कामठी माजी तालुकाध्यक्ष होते. 

अपघातानंतर त्यांना आशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने भाजप कार्यकर्ते संतापले. त्यांनी नागपूर-जबलपूर महामार्ग उपजिल्हा रुग्णालयाजवळ रोखून धरला. रस्ता बांधकाम कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नया गोदामासमोरील नागपूर मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी दुपारी ट्रकच्या मागे ते जात होते. दरम्यान, ट्रकसमोर असलेल्या हातरिक्षा चालकाने ट्रकला जागा दिली, मात्र जागा कमी असल्याचा अंदाज बांधून अरुण मोटघरे यांनी थेट गाडी ट्रकच्या पुढे काढण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान वळण आल्याने भरधाव ट्रकने सोबत जाणाऱ्या अरुण यांच्या दुचाकीला धडक दिली व येथेच घात झाला. ट्रकची धडक बसल्यावर ते खाली पडले. या ठिकाणी काही मांस विक्रेत्यांची दुकाने आहेत. मात्र आज शुक्रवार नमाजीचा दिवस असल्याने तेही जागी नव्हते. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाला. छावणी परिषदेचे नगरसेवक चंद्रशेखर यांनी जखमी अरुण यांना आशा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे त्यांना मृत घोषित केले. नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेहाला कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी आरोपी ट्रकचालक उमेश भोलानाथ यादव (वय 36, रा. टेकानाका, नागपूर) यास अटक केली आहे. अरुण पोटभरे यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील तसेच तीन भाऊ व चार बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी सकाळी 10 वाजता येरखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

महामार्गाच्या कामासाठी दिले होते निवेदन 
कामठी-नागपूर महामार्गाचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी अरुण पोटभरे यांनी नितीन गडकरी यांना निवेदन दिले होते. पंधरा दिवसांत काम पूर्ण करावे अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनापूर्वी या रस्त्यावर त्यांचा घात झाला. यामुळेही कार्यकर्ते संतापले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT