Nitin Gadkari vikas Thakre 
विदर्भ

Nagpur Lok Sabha Result: गडकरी जिंकले, पण एक गोष्ट मनासारखी झाली नाही; ठाकरेंनी दिली चिवट लढत

Nitin Gadkari Win Lok Sabha Election: नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी यांचा विजय झाला आहे.

कार्तिक पुजारी

Nagpur Lok Sabha Election Result: नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी यांचा विजय झाला आहे. गडकरीच या मतदारसंघातून तिसऱ्यांदा बाजी मारतील असा अंदाज होता. त्याप्रमाणे ते जिंकले देखील आहेत. मात्र, एक गोष्ट नितीन गडकरी यांच्या मनासारखी घडली नाही. मतदार ५ लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानी निवडून देतील असा दावा त्यांनी केला होता. पण, त्यांचे मताधिक्य याच्या जवळपास देखील नाही असं चित्र आहे.

नितीन गडकरी यांना ६,५५,०२७ मतं (५४.१ टक्के) मिळाली आहेत, तर विकास ठाकरे यांना ५,१७,४२४ (४२.७ टक्के ) मतं मिळाली आहेत. याचा अर्थ गडकरींनी फक्त १ लाख ३७ हजार मतांची आघाडी घेतली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी गडकरींना २ लाख १८ हजारांचं मताधिक्य होतं. त्यामुळे मताधिक्य वाढलं तर नाही त्यात घटच झाल्याचं स्पष्ट आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नाना पटोले यांच्याविरोधात गडकरींची लढत झाली होती. या लढतीत काँग्रेसने चांगला जोर लावला होते, मात्र नितीन गडकरी पुन्हा निवडून आले. गडकरींना ६,५७,६२४ मतं मिळाली होती. त्यांचं मताधिक्य २ लाख १८ हजार मतांचं होतं. नाना पटोले यांना ४ लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. याचा अर्थ विकास ठाकरे यांनी नाना पटोले यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली आहेत.

पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघापैकी चार लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. केवळ नागपूरमध्ये भाजपला जागा कायम ठेवता आली. २०१९ मध्ये पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात भाजपचे खासदार होते. रामटेकमध्ये शिवसेनेचा खासदार होता, तर चंद्रपूरमध्ये एकमेव काँग्रेसचा खासदार होता. यावेळी चित्र पूर्ण वेगळं आहे. नागपूरसोडून इतर चारही मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

गडकरींसमोर विकास ठाकरे टिकणार नाहीत, असं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. पण, ठाकरेंनी त्यांना चांगली टक्कर दिली आहे. देश पातळीवर केलेली विकासकामे आणि स्वच्छ प्रतिमा याचा ठाकरेंचा नक्कीच फायदा झालाय. पण, ठाकरेंना देखील चांगली मतं मिळाली आहेत. त्याचमुळे ठाकरे यांनी हा माझा नैतिक विजय आहे, असं म्हटलं असावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचात निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT