bjp party workers disappointed due to bjp nagpur executive committee
bjp party workers disappointed due to bjp nagpur executive committee 
विदर्भ

पदाधिकारी बैठकीला का आले नाही? भाजपच्या कार्यकारिणीवरून नाराजी

राजेश चरपे

नागपूर : शिस्तप्रिय भाजपात शहर कार्यकारिणीवरून असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर बोलावलेल्या बैठकीला अनेकांनी दांडी मारून आपली नाराजी दर्शवली. कोरोनाचे कारण देऊन पक्षातर्फे सारवासारव करण्यात आली असली तरी अनेकांनी खासगीत राग व्यक्त करून आपण नाखूश असल्याचे सांगितले. 

एकाच विधानसभा मतदारसंघातील दोघांना महामंत्री करणे, अनुसूचित जातीला मुख्य कार्यकारिणीत स्थान नाही, महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत पक्षात दाखल झालेल्यांची दखलही घेण्यात आली नाही, अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्यांना डावलणे तर काही जणांवर विशेष मर्जी दाखवणे ही नाराजीची प्रमुख कारणे असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके निष्ठावंतांपैकी एक आहेत. भाजयुमोचेही ते पदाधिकारी होते. त्यामुळे संपूर्ण शहरात त्यांचा संपर्क आहे. प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांची टीम सर्वसमावेशक व संतुलित राहील असे अनेकांना वाटत होते. शहराच्या महामंत्र्यांमध्ये प्रत्येकवेळी एक अनुसूचित जाती जमातीचा प्रतिनिधी असायचा. 

माजी उपमहापौर संदीप जाधव दोनवेळा, धर्मपाल मेश्राम एकवेळ महामंत्री होते. ते महापालिकेत पदाधिकारी झाले असल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्याला स्थान देण्यात आले नाही. राजेश हातीबेड यांना अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष करण्यात आले आहेत. याबद्दल कुणाचा वाद नाही. मात्र, मुख्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नसल्याने अनेकांनी नाराजी बोलून दाखवली आहे. संजय बंगाले आणि सुनील मित्रा यांना महामंत्री करण्यात आले आहे. हे दोघेही पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. मात्र, शेजारच्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून एकही महामंत्री घेण्यात आला नाही. ही बाब अनेकांना खटकली. 

विधानसभेच्या आधी इतर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांना कार्यकारिणीत स्थान देऊन आपलेसे केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सर्वांना विशेष निमंत्रितांमध्ये कोंबण्यात आले. नाही म्हणायला दोन-दोन डझन उपाध्यक्ष आणि मंत्री करून अनेकांना पक्षात कायम राहावे, याची सोय करण्यात आली आहे. आधीच्या शहराध्यक्षांच्या वैयक्तिक नाराजीचा फटका बसलेल्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जाईल, असे वाटत होते. मात्र, त्यांनाही वेटिंगवरच ठेवण्यात आले आहे. आगामी महापालिकेची निवडणूक वॉर्डनिहाय होणार आहे. त्यामुळे अंतर्गत नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT