vidarbha sakal
विदर्भ

भाजपच्या आसूड मोर्चा प्रकरण ; आयोजकांसह तब्बल आठशे जणांवर गुन्हे

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व कोरोनाविषयक नियमांचा भंग झाल्याचा ठपका

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्ह्यात २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान भाजपने विविध ठिकाणी आसूड मोर्चा काढला होता. या मोर्चांमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व कोरोनाविषयक नियमांचा भंग झाल्याचा ठपका ठेवत चिखली, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर येथील भाजप नेते व शेतकऱ्यांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुरुवारी (ता. २८) बुलडाणा शहरातही माजी आमदार विजयराज शिंदे व योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मोर्चा आयोजकांसह तब्बल ७०० ते ८०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी या मोर्चांचे आयोजन भाजपने केले होते. उपविभागीय कार्यालये व शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चांना परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले व साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी तब्बल आठशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

SCROLL FOR NEXT