milk 
विदर्भ

Video : भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन, अडविल्या दुधाच्या गाड्या!

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : कोरोनाचा फटका इतर व्यवसायाप्रमाणेच शेतीपुरक व्यवसायांनाही बसला आहे. परिणामी दूधाचे भाव आणि खप घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या अडवून आंदोलन केले.
राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन असताना सर्व दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज अमरावती येथे भाजप व किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या गाड्या अडवून सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन केले.

महाराष्ट्रात दररोज दुधाचे उत्पादन 1 कोटी 40 लाख लिटरच्या आसपास होते. कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स, स्वीटहोम, चहाटपरी, डोमिनोज्स पिज्जा अशाप्रकारे दूध व दुधाच्या पदार्थांची विक्री करणारी साधने बंद झालेली आहेत. परिणामी 20 मार्च 2020 पासून पिशवी पॅकिंग दुधाचा खप 30 ते 35 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आलेला आहे. तसेच दुधाच्या प्रॉडक्‍टची विक्री 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आलेली आहे.

दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. तरी राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर 10 रुपये अनुदान द्यावे अथवा गायीचे दूध प्रती लिटर 30 रुपये दराने खरेदी करावे, यांसह अन्य मागण्यांसाठी अमरावती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या गाड्या अडवून आंदोलन केले. या वेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. झोपलेल्या सरकारला जाग येत नसेल तर लोकप्रतिनिधींच्या घरातील दूध बंद करू, असा इशारा माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी या वेळी दिला.
संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

Mumbai News: 'लालबागचा राजा'च्या दरबारात दुर्दैवी घटना! मंडपाजवळ ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'कोण होणार करोडपती' साठी डिझायनर साडीऐवजी पैठणीच का नेसली? माधुरी दीक्षितने दिलं खरं उत्तर, म्हणते-

Maharashtra Ganesh Visarjan Live: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गणरायाला भक्तिभावाने वाजतगाजत निरोप

Mukhyamantri Vayoshri Yojana : ‘वयोश्री योजने’चा थकलेल्या हातांना मोठा आधार जिल्ह्यात १७ हजार ज्येष्ठांना लाभ; प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग

SCROLL FOR NEXT