वाशीम ः जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळामध्ये ता. 21 मार्च 2020 पासून ते ता. 13 जूनपर्यंत एकूण 920 जणांचे रक्तसंकलन केले. तर गरजू 740 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीकडून रक्तपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात तब्बल 90 रुग्णांना दरमहा रक्तपुरवठा करावा लागतो.
या रुग्णांना रक्तपुरवठा न झाल्यास त्यांचे जीवन रक्तदात्यांच्याच हाती असते.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीमध्ये 2010 पासून ते सद्यस्थितीपर्यंत एकूण रक्त संकलन हे 19 हजार 155 एवढे झाले आहे. तर 17 हजार 590 जणांना रक्तपुरवठा करण्यात आला आहे. शासकीय रक्तपेढीमधून थालेसेमिया, सिकलसेल, हिमोफेलिया, अप्लास्टीक अनेमिया या आजारग्रस्त 90 जणांना दरमहा रक्तपुवठा केला जातो. तसेच स्त्रीयांना प्रसुतीकरीता, अपघातग्रस्त व इतरही गरजूंना रक्तपुरवठा केला.
सध्या कोवीड-19 ची साध सुरू असल्यामुळे ता. 21 मार्च पासून ते आज (ता.13) पर्यंत 23 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमधून 920 जणांचे रक्तसंकलन केले तर 740 रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आला आहे. याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खेळकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे, रक्तपेढी प्रमुख डॉ. किशोर लोणकर, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. बालाजी हरण यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’
दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत रक्तदान कर्त्यांची संख्या वाढत नाही. त्यामुळे आपण दिलेले रक्त कोण्यातरी गरजूचे प्राण मृत्यूच्या उंबरठ्यावरून वापस आणू शकतो. त्यामुळेच जगात रक्तदान हेच श्रेष्ठ दान म्हटले जाते. त्यामुळे सामाजिक दृष्टीकोणातून प्रत्येकाने रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वर्ष............रक्तसंकलन .........रक्तपुरवठा
2010...........300.....................243
2011............631....................558
2012...........1265.................1118
2013............1080..................935
2014............2137................2037
2015............2247................2042
2016............2171................2034
2017............2025................1814
2018............2848................2712
2019............2751................2667
13 जून 2020...1700..............1430
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.