file photo
file photo 
विदर्भ

मुलगी झाल्याच्या आनंदात रक्तदान

भूषण काळे

अमरावती : मुलीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मुलगी झाल्याचा आनंद काय असतो, हे वलगाव येथील मदने कुटुंबीयांनी दाखवून दिले. मुलगी झाल्याने मदने कुटुंबीयातील सदस्यांनी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. प्रकाश सीताराम मदने व मोहना प्रकाश मदने यांना 17 जून रोजी कन्यारत्न झाले. या कन्येचा अभिमान बाळगून मदने परिवारातील सदस्यांनी रक्तदान करून आनंदोत्सव साजरा केला.
"पहली बेटी, तुप रोटी' असे म्हटले जाते. मुलगा हा वंशाचा दिवा असला; तरी दोन्ही घरांना प्रकाशमान करण्याचे काम मुलगी करते. मुलगा हा वंशाचा दिवा असल्याने पूर्वी सर्वांनाच मुलगा हवा, अशी इच्छा होती. परंतु अलीकडे काळ बदलल्याने नकोशी असलेली मुलगी प्रत्येकालाच हवीहवीशी झाली आहे. सध्या परिस्थिती बदलल्याने मुलापेक्षा मुलगीच बरी, अशी सर्वांचीच धारणा झाली आहे. पहिले माहेरचा अन्‌ नंतर सासरचा, असा दोन्ही कुटुंबांचा सांभाळ करणारी मुलगीच राहते.
शनिवारी (ता.22) इर्विन रुग्णालयात जाऊन मदने कुटुंबातील 11 सदस्यांनी रक्तदान करून चळवळीला बळ दिले. प्रकाश मदने यांच्यासह राजेंद्र मदने व त्यांची पत्नी लता, संतोष मदने व त्यांची पत्नी उषा, विठ्ठल मदने, शक्ती मदने, शुभम मदने, तुषार माहोरे, नरेंद्र वडे व अंकुश रंगारी यांनी रक्तदानात सहभाग नोंदविला. मदने कुटुंबीयांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वांनीच त्यांचे कौतुक केले.
एकत्र कुटुंब
प्रकाश सीताराम मदने यांना चार भावंडे असून वलगाव येथे एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. प्रत्येक सण सर्वच कुटुंबातील सदस्य आनंदाने साजरा करतात. मुलगी झाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याने मदने कुटुंबीयांनी रक्तदान करून आपला आनंद द्विगुणीत केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT