Borders are sealed but Traffic is going on by sneaky road  
विदर्भ

जिल्ह्याच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त, मात्र चोरट्या मार्गांनी वाहतुक सुरूच

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. हीच स्थिती कायम ठेवण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर अंमलबजावणी करणे सुरू आहे. याच अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत, असे असले तरी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा सुरूच आहे. काही ठिकाणी सर्वसामान्यांकडून चोरट्या मार्गाचा अवलंब करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

या सर्व चोरट्या मार्गाचा साधारणत: यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांकडून वापर होत असल्याचे दिसून आले आहे. येथील नागरिक साती-पोटी येथील वर्धा नदीतून तर काही नागरिक देवळी तालुक्‍यातील अंदोरी येथील पुलाच्या खालून वर्ध्यात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची महिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून काही ठोस उपाययोजना आखण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे.

वर्ध्यात केवळ या चोरट्या मार्गानेच नाही तर रेड झोनमध्ये असलेल्या गावातूनही अनेकांची ये-जा सुरू असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये विशेषत: शासकीय कर्मचारी असल्याचे निदर्शनात आले आहे. यात आरोग्य विभागाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, बॅंकांच्या कर्मचाऱ्यांचा अधिक भरणा असल्याचे दिसून आले आहे. यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या स्वलाभापोटी जिल्ह्यातील सर्वसामान्यांचा जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा कर्मचाऱ्यांवर वचक बसविणे आवश्‍यक झाले आहे.

जिल्ह्यात 16 ठिकाणी चेकपोस्ट

जिल्ह्य्रात खबरदारी म्हणून विविध मार्गावर 16 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. येथे पोलिसांचा ताफाअसल्याने येथून जिल्ह्यात येणे शक्‍य नाही. पण, नागरिकांनी यावरही मार्ग काढला असून अनेक चोरट्या मार्गाचा वापर त्यांच्याकडून होत असल्याचे दिसून आले आहे. याला आळा घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर आले आहे.

प्रशासनाला माहिती दिली

देवळी तालुक्‍यातील अंदोरी येथे असलेल्या नदीच्या पुलाखालून यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव येथील नागरिक ये-जा करीत आहेत. याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे. शिवाय परिसरातील गावकऱ्यांनाही येणाऱ्या नागरिकांपासून सावध राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दिलीप उटाणे, आरोग्य सेवक, गौळ

गस्त वाढविली आहे
वर्धा आणि सेलू उपविभागात नागपूरकडून येणारे अनेक चोर रस्ते होते. त्याची माहिती घेत ते बंद करण्यासाठी या मार्गावर गस्त वाढविण्यात आली आहे. असे असतानाही काहींजणांकडून असे अनेक मार्ग शोधण्यात येतात. या मार्गांचाही शोध घेत ते बंद करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
-पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी, वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT