file photo
file photo 
विदर्भ

सुरक्षारक्षकांची व्यथा; साहेब, पाचशे रुपये देता का उधार? 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : साहेब, 500 रुपये उधार देता का? पगार झाला की परत करतो. समोर दिवाळी आहे.... लेकरासाठी नवीन कपडे घेऊन जाईन... तीन महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे असे संवाद दहा दिवसांपासून सुरक्षारक्षकांमध्ये सुरू आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयात तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाने माथाडी मंडळामार्फत नवीन सुरक्षा यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, मनोरुग्णालयात रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सुरक्षा करणाऱ्या या सुरक्षारक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. एकमेकांना उसनवारीवर पैसे देऊन गरज भागवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 
तीन-चार दिवसानंतर दिवाळीचा सण आहे. सारे वातावरण आनंदी असावे असे वाटते. परंतु, तीन महिन्यांपासून वेतनाशिवाय हे सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत आहेत. यामुळेच एकमेकांना उसनवारीवर पैसे मागून सण साजरा करण्याची व्यथा एका कर्मचाऱ्याने बोलून दाखवली. विशेष असे की, कोट्यवधींचा चुराडा निवडणुकीत केला जातो. मात्र, सर्वांत खालच्या स्तरावर नोकरी करणाऱ्या या सुरक्षारक्षकांना दोन वेळेस पुरेल एवढे वेतनही देण्यात येत नाही. विशेष असे की, तीन महिन्यांपूर्वीच माथाडी मंडळामार्फत नवीन सुरक्षारक्षक तैनात झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी असलेली सुरक्षा एजन्सीच्या सुरक्षारक्षकांनाही सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही, तेदेखील येथे खेटा घालत असल्याची माहिती पुढे आली आहे. 
लाखोंची उधळपट्टी 
मनोरुग्णालय प्रशासनाने पन्नासपेक्षा अधिक सीसीटीव्ही लावून लाखोंची उधळपट्टी केली. यातील अनेक कॅमेरे बंद आहेत. पैसा पाण्यात गेला; मात्र हे सुरक्षारक्षक रात्रंदिवस येथे कर्तव्यावर असतात. त्यांना मात्र कामाचा मोबदलाही मिळत नाही, असे पक्षपाती धोरण राबविण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT