file photo 
विदर्भ

पुण्यातून आलेले दोघे भंडाऱ्यात निघाले कोरोना पॉझिटिव्ह...जिल्हावासी दहशतीत

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : पुणे येथून दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दाखल झालेले दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे ऑरेंजमधून ग्रीन झोनकडे वाटचाल करणाऱ्या जिल्ह्यात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे जिल्हावासीही दहशतीत आहेत. राज्यातील विविध भागात अडकून पडलेल्या विद्यार्थी, पर्यटक, नागरिक व स्थलांतरित कामगारांना आपापल्या जिल्ह्यात पोहोचविण्यात यावे, असे निर्देश राज्यशासनाने दिले होते.

दरम्यान, जिल्ह्यातसुद्धा याअनुषंगाने अंमलबजावणी सुरू झाली. याआठवड्यात परराज्यातून व राज्यातील मोठ्या शहरातून लॉकडाउनमध्ये अडकलेले नागरिक दाखल होत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातून काही व्यक्ती भंडारा शहरात दाखल झाले. त्यांची प्राथमिक तपासणी करून विलगीकरण कक्षात त्यांना भरती करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूर मेयो येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

संपर्कात आलेल्यांच्या शोधाचे आव्हान

शनिवारी (ता. 16) हे नुमने प्राप्त झाले असून ते पॉझिटिव्ह आले आहेत. यावृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या व प्रशासनाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही संस्थात्मक क्वारंटाइन असल्याने ज्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते तेथील विलगीकरणात असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याशिवाय ज्या वाहनांमधून त्यांनी प्रवास केला अन्‌ ज्यांच्या संपर्कात ते आले त्यांचा शोध घेऊन तपासणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

जिल्हावासींची झोप उडाली

यापूर्वी 27 एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिली महिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळली होती. 14 दिवसांनंतर तिचे दोन्ही तपासणी अहवाल 11 मे रोजी निगेटिव्ह आले होते. तेव्हापासून 14 दिवसांनी जिल्हा कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल सुरू होती. अशातच बाहेरून आलेले हे दोघे पॉझिटिव्ह निघाल्याने आता जिल्हावासींची झोप उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

Parner News : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या पारनेर जागेसाठी नीलेश लंके विरुद्ध राहुल शिंदे; थेट लढत निश्चित

M.Pharmacy Admission : एम. फार्मसीच्या चौथ्या फेरीत चार हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; २४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

CJP Leaders Bail Update : सौरव दास, आशुतोष रांका यांची तुरुंगातून सुटका; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात CJP पुन्हा आक्रमक

Water Supply Scheme Issue : रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांवरून जिल्हा परिषदेत वाद; आठवडाभरात अहवाल देण्याचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT