Boy arrested for molestation in chandrapur 
विदर्भ

निवडणुकीत आई-वडील विजयी; जल्लोषात सहभागी होण्याआधीच मुलाला झाली अटक, वाचा संपूर्ण प्रकार

भोजराज नवघडे

नागभीड (जि. चंद्रपूर) : ग्रामपंचायत निवडणुकीत आई-वडिलांचा विजय झाला. मात्र, विजयाच्या जल्लोषात सामील होण्याचा आनंद मुलाला घेता आला नाही. निकालाच्या आदल्याच दिवशीच मुलाला पोलिस कोठडीची हवा खावी लागली. विनयभंगाच्या आरोपाखाली अटकेतील आरोपीचे नाव अभिषेक अशोक कोहपरे (वय १९) असे आहे.

विनयभंग आणि समाजमाध्यमावर मुलीची बदनामी प्रकरणात अभिषेक अटकेत आहे. १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यात अभिषेकचे आई-वडील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे होते. ते दोघेही निवडून आले.

या निवडणुकीत मुलाने आई-वडिलांच्या विजयाच्या परिश्रम घेतले. मात्र, निकालाच्या आदल्या दिवशी १७ जानेवारीला मुलाला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेतल्याने गावात एकच चर्चा सुरू झाली.

अभिषेक तळोधी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मुलगी तिथेच शिक्षण घेत होती. ती अल्पवयीन आहे. तिचे गाव ब्रह्मपुरी तालुक्‍यातील आहे. ती इकडे मामाकडे राहून शिक्षण घेत होती. दरम्यान त्याचे तरुणीसोबत प्रेम जुळले. काही कारणांमुळे त्याच्यात वाद निर्माण झाला.

दरम्यान आरोपीने मुलीने तिच्या गावात जाऊन मारपीट केली. समाज माध्यमावर आक्षेपार्ह छायाचित्र टाकण्याची धमकी दिली. मुलीने अभिषेक विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तो सध्या चंद्रपूर कारागृहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: महाड दासगावमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय, भरत गोगावलेंच्या मतदारसंघात संपूर्ण पॅनलवर बाजी

Solapur ZP election Results : माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी विजयी, उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव; विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला

Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Kankavli Zilla Parishad Election Results : कोकणात भाजपने उघडले विजयाचे खाते; कणकवलीत राजेश जाधव ९४८ मतांनी विजयी, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव : कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व! रफिक नाईक ठरले 'टफ फायटर', पण विजय गुरुप्रसाद शिंदेंचाच; रामचंद्र राऊत तिसऱ्या क्रमांकावर

Kolhapur ZP : रिल्स स्टार काँग्रेस उमेदवार सोनाली सावंत विजयी, शिरोळमध्ये राजू शेट्टींनी खाते उघडले, गणपतराव पाटील, यड्रावकर गटासोबत जोरदार चुरस

SCROLL FOR NEXT