Nagpur-Municipal 
विदर्भ

बंद करा ‘बीपीएमएस’ प्रणाली

सकाळवृत्तसेवा

नागपूर - बांधकाम परवानगीसाठी राज्य सरकारने बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सर्व्हिस (बीपीएमएस) ही नवी प्रणाली सुरू केली. मात्र, या प्रणालीच्या वापरामुळे महापालिकेच्याच उत्पन्नाला फटका बसत असल्याने आज सभागृहात सत्ताधारी नगरसेवकांनीच बीपीएमएसला विरोध केला. महापौर नंदा जिचकार यांनी ही प्रणाली न वापरता बांधकाम मंजुरीचे सर्व प्रस्ताव निकाली काढण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले. 

बांधकाम परवानगीसाठी राज्य सरकारने जुलैपासून बीपीएमएस प्रणाली वापरण्याचे निर्देश सर्व महापालिकांना दिले. नागपूर महापालिकेतही ऑटो डीसीआर प्रणाली मोडित काढत बीपीएमएस प्रणाली सुरू करण्यात आली. या प्रणालीमुळे बांधकाम परवानगी ऑनलाईन करण्यात आली. मात्र, या प्रणालीच्या वापराबाबत अधिकाऱ्यांचे अज्ञान आणि बिल्डरच नव्हे तर सामान्य नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बांधकाम मंजुरीला परवानगी देताना अडथळे निर्माण झाल्याने महापालिकेच्या यातून मिळणाऱ्या उत्पन्नालाही फटका बसला. या प्रणालीमुळे किती बांधकाम मंजुरीचे प्रकरण रखडले, किती मंजूर झाले? असा सवाल माजी महापौर प्रवीण दटके यांनी केला.

यावर नगररचनाचे गावंडे यांनी सुधारणा करण्यात येत असल्याचे नमूद करीत या प्रणालीमुळे मंजुरीचे प्रकरणे रखडल्याचेही अप्रत्यक्षरीत्या मान्य केले. तूर्तास ६३ बांधकाम मंजुरीचे प्रकरण प्रलंबित असून, यातून महापालिकेला २५ कोटी मिळणार आहे. या प्रणालीमुळे सामान्य नागरिकांनाही त्रास होत आहे.

या प्रणालीत सुधारणा होईस्तोवर हस्तलिखित पद्धतीने बांधकाम मंजुरीचे प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश द्यावे, अशी सूचना महापौर नंदा जिचकार यांना केली. शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असून, महापालिकेला त्याचे शुल्क मिळत नाही. यावर चर्चेसाठी विशेष सभेचे आयोजन करावे, अशी मागणी दटके यांनी केली. महापौरांनी या प्रणालीमुळे दिरंगाई होत असून, शासनानेही ती प्रणाली अनिवार्य केली नाही. त्यामुळे पुढील सहा महिन्यात ऑफलाईन पद्धतीनेच बांधकाम मंजुरीचे प्रकरणे निकाली काढावे, असे निर्देश दिले. 

‘सकाळ’ने वेधले लक्ष 
बीपीएमएस प्रणालीमुळे बांधकाम मंजुरीचे प्रस्ताव रखडले असून, उत्पन्नाला ‘ब्रेक’ लागल्याकडे लक्ष वेधणारे वृत्त आज, शनिवारी ’सकाळ’ने प्रकाशित केले. या प्रणालीमुळे गेल्या तीन महिन्यांत महापालिकेला ४६ कोटींचे नुकसान झाल्याचेही या वृत्तात नमूद केले होते. ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत सत्तापक्ष नेते जोशी, दटके यांनी सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT