Male tiger carcass found in the Baradkinhi farm area of Brahmapuri.
esakal
ब्रह्मपुरी,: उत्तर वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बरडकिन्ही शेतशिवारात अंदाजे दीड ते दोन वर्ष नर वाघाचा मृतदेह आढळून आला. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. ही घटना शनिवारी (ता. ३) उघडकीस आली.
बरडकिन्ही येथील शेतकरी पटवारी रामाजी गेडाम हे ३ ऑक्टोबर रोजी आपल्या गट क्रमांक २६२ मधील शेतात गेले. तेव्हा त्यांना एका वाघाचा मृतदेह आढळून आला
त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ ब्रह्मपुरी वन विभागाला दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक वन संरक्षक डॉ. महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार यांच्या नेतृत्वात पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, वनरक्षक राजेंद्र भरणे, दिलीप लाडे, सचिन शेंडे, मासाळकर आणि क्षेत्र साहाय्यक राकेश चौधरी यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला
.बरडकिन्ही शेतशिवारात दोन वाघांमध्ये वर्चस्वाची लढाई झाली. यात अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाच्या नर वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या वाघाने या वाघाचा जंगलातून शेतापर्यंत पाठलाग करून त्याला ठार केले. त्याचा काही भाग खाल्ल्याचेही घटनास्थळावरील दृश्यावरून निष्पन्न झाले आहे.
पंचनाम्यानंतर मृत वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी वन विभागात आणण्यात आला. ब्रह्मपुरीचे साहाय्यक आयुक्त संजय बावणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल उरकुडे आणि शंकरपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील यांच्या पथकाने वाघाचे शवविच्छेदन केले. मृत्यूचे अचूक कारण आणि अधिक तपासासाठी वाघाचा विसरा फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.