file photo 
विदर्भ

मैत्रिणीसोबतच्या ब्रेकअपचा राग दुसरीवर काढला

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील एका विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्याच महाविद्यालयातील दुसऱ्या विद्यार्थ्याने मारहाण केल्याने राडा झाला. बुधवारी (ता.21) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी पीडीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एका गावातील युवती याच विधी महाविद्यालयात शिकायला आहे. पीडितेसोबत पाचव्या सेमिस्टरला शिकणारा विद्यार्थी अजिंक्‍य सिनकर (रा. यवतमाळ) याने वाद घातला व महाविद्यालय परिसरात अडवून मारहाण केली. काही मुलांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांमधील वाद मिटला. मारहाण करणारा विद्यार्थी अजिंक्‍य तेथून पसार झाला. जखमी विद्यार्थिनीने घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिली. सुरुवातीला प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर प्राचार्य प्रणय मालवीय, दक्षता समितीच्या अध्यक्ष प्रा. भाग्यश्री देशपांडे यांच्यासह अन्य विद्यार्थिनींनी जखमी विद्यार्थिनीस उपचारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी विधी महाविद्यालयात जाऊन महाविद्यालयीन प्रशासनाकडून माहिती घेतली. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. विद्यार्थिनी पडल्यामुळे जखमी झाल्याचे प्रथम पोलिसांना सांगितले गेले. त्यानंतर कसून चौकशी केली असता विद्यार्थिनीला याच महाविद्यालयाचा विद्यार्थी अजिंक्‍य याने लाथाबुक्‍यांनी मारहाण केल्याचे सांगितले. गाडगेनगर पोलिसांनी पीडीएमसी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनीचे बयाण नोंदविले आहे.
जखमी विद्यार्थिनीची एक मैत्रीण पुण्यात शिकायला आहे. अजिंक्‍यची तिच्या मैत्रिणीसोबत मैत्री होती. परंतु मंगळवारी (ता. 20) त्यांचे ब्रेकअप झाले. त्यातून अजिंक्‍यने आपल्यासोबत वाद घातला व मारहाण केली, असे जखमी विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT