file photo 
विदर्भ

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : येथील शहर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणारा पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई अमरावती येथील पथकाने शुक्रवारी (ता.चार) शहर पोलिस ठाण्यात केली.
गजानन भाऊराव पिसे (वय 51) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यवतमाळ शहरातील बांगरनगर येथील तक्रारदाराच्या भावाच्या पत्नीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. दाखल असलेल्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलिस हवालदार पिसे याने करून लाच मागितली. मात्र, तक्रारदाराने रक्कम न देता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी (ता. चार) "एसीबी'ने सापळा रचला. पोलिस कर्मचाऱ्यास तक्रारदारावर संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT