bajar samiti shegaon 
विदर्भ

दादा म्हणतात, ‘मी पुन्हा येईन’

श्रीधर ढगे

खामगाव : शेगाव बाजार समिती मधील परिवर्तन पॅनल अल्पमतात आले असून, आता सभापती गोविंद मिरगे यांच्यावर देखील अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. शेगाव बाजार समितीमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांनी ‘मी पुन्हा येईन’ असा चंग बांधला आहे. लवकरच ते आपल्या सहकार पॅनलकडून गोड बातमी देण्यासाठी व्यूव्हरचना करत आहेत.

शेगाव बाजार समितीवर गेली अनेक वर्षे पांडुरंगदादा पाटील यांचे वर्चस्व राहिले. मध्यंतरीच्या काळात सत्ता समीकरणे बदलून ही बाजार समिती भारतीय जनता पक्ष प्रणित परिवर्तन पॅनलकडे गेली व सभापती पदी गोविंदराव मिरगे यांची निवड झाली. मात्र, आता मिरगे यांचे सहकार पॅनल अल्पमतात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रुपाली अनंत बरडे यांना संचालक पदावरून कमी करण्यात आल्यामुळे बाजार समितीचे विद्यमान सभापती गोविंद मिरगे यांचे पद अल्पमतात आले आहे. 

उपसभापतींनी घेतला होता जाहीर प्रवेश
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलचे १० व सहकार पॅनलचे ८ संचालक निवडून आल्यानंतर विद्यमान सभापती गोविंद मिरगे यांची परिवर्तन पॅनलच्या संचालकांच्या पाठींब्याने सभापती पदावर निवड झाली होती. त्यानंतर उपसभापती सुनिल वानखडे यांनी सहकार पॅनलमध्ये जाहीर प्रवेश घेतल्याने परिवर्तन पॅनल व सहकार पॅनलचे ९ असे समान संचालक झाले. 

परिवर्तन पॅनलकडे आठ संचालक
आता परिवर्तन पॅनलच्या संचालिका रुपाली अनंता बरडे यांचे संचालकपद खारीज झाल्याने परिवर्तन पॅनलचे ८ व सहकार पॅनलचे ९ संचालक झाले आहेत. आता विद्यमान सभापती गोविंद मिरगे यांचे पद अल्पमतात आले आहे. आता सभापतीपदी सहकार पॅनलकडून पांडुरंगदादा पाटील हे सभापती होतात की, अन्य कुणाला संधी देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सभापतींवर अपात्रतेची टांगती तलवार
सभापती गोविंदराव मिरगे यांनी इतिवृत्त पुस्तिका ताब्यात ठेवली तसेच अनाठायी व व्यक्तिगत स्वरूपाचा खर्च करून निधीचा दुरुपयोग अशी तक्रार पणन संचालक पुणे यांचेकडे अपील दाखल केले होते. त्याचा अहवाल आला असून, मिरगे यांच्यावर कारवाईचे संकेत आहेत. दरम्यान, सभापती मिरगे यांच्या स्वाक्षरीचा अधिकार काढावा अशी लेखी मागणी सहकार पॅनेलने बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयत मिरगे यांच्यावर अविश्वास सुद्धा दाखविण्यात आला. सभापतींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

सर्वाधिक काळ दादांचे वर्चस्व
शेगाव बाजार समितीची स्थापना १ एप्रिल १९८८ रोजी झाली. ही बाजार समिती अ वर्ग गटात येते. राजकीय जाणकारांच्या माहितीनुसार गेली अनेक वर्ष म्हणजेच जवळपास ४० वर्ष बाजार समितीवर दादा यांच्या गटाचे वर्चस्व राहिले. मध्यंतरी काही काळ बाजार समिती आपल्याकडे घेण्यात भाजपप्रणीत वर्तन पॅनल यश आले होते. आता पुन्हा बाजार समितीत ‘दादागिरी’ अर्थातच सहकार पॅनलचे वर्चस्व राहील असे चित्र दिसून येते.

पुन्हा सहकार पॅनलची सत्ता येणार
परिवर्तन पॅनलचे एक संचालकपद खारीज झाल्याने त्यांच्याकडे ८ तर आमच्या सहकार पॅनलचे ९ संचालक आहेत. त्यामुळे त्यांचे सभापती यांचे पद धोक्यात आहे. शेगाव बाजार समितीमध्ये आमच्या सहकार पॅनलकडे संख्याबळ जास्त आहे. आम्ही सभापतीवर अविश्वास ठराव दाखल केला असून, त्यावर लवकरच निर्णय होईल. शेतकरी हिताचे विचार करणाऱ्या सहकार पॅनलची सत्ता पुन्हा बाजार समितीमध्ये येईल हे आता निश्चित झाले आहे.
-पांडुरंगदादा पाटील, सहकार नेते, शेगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT