file photo
file photo 
विदर्भ

बिल्डर्सकडील छाप्यात 10 कोटी जप्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील सहा बिल्डर्सवर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी टाकलेल्या छाप्यात 10 कोटींपेक्षा अधिक रोख रकमेसह दागिने जप्त केले. छाप्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू असून लॉकर्ससह बेहिशेबी जमिनीचे कागदपत्रे ताब्यात घेतले आहे. या बिल्डर्सच्या व्यवसायात विदर्भातील अनेक राजकीय नेत्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहे.
प्लॉट आणि बांधकाम व्यवसाय करताना सहाही बिल्डर्स भागीदारीतून विविध प्रतिष्ठानांच्या माध्यमातून अधिकाधिक रोखीने व्यवहार करून प्राप्तिकराची चोरी करीत असल्याचेही मिळालेल्या कागदपत्रांवरून उघड झाले आहे. तसेच जमिनीच्या खरेदीत संशयास्पद व्यवहार झाल्याचे कागदपत्रेही सापडली आहेत. सहाही बिल्डर्सच्या निवासस्थानातून अंदाजे 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त केलेली आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले. तसेच या बिल्डर्ससोबत रोखीने व्यवहार केलेले इतरही बिल्डर्स अडचणीत येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. यानिमित्ताने बांधकाम व्यावसायिक आणि रोखीने व्यवहार केलेल्या खरेदीदारांचीही चौकशी केली जाण्याचे संकेत मिळू लागले आहे.
ऑरेंजसिटी हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि सप्तगिरी समूहाचे संचालक अतुल यमसनवारसह भागीदार व्यंकटेश कुणावार, सुधीर कुणावार, चंद्रकांत पद्मावार, विश्‍वास चकलनवार आणि प्रशांत बोनिरवार यांच्या निवासस्थानांसह प्रतिष्ठानांची अद्यापही झाडाझडती सुरू आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी छापे टाकलेल्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. या छाप्यात सापडलेल्या संशयास्पद कागदाची पाहणी सूक्ष्म पद्धतीने विभागाचे कर्मचारी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. अजनी चौकातील एनवायके टॉवर्समधील कार्यालयासह खरे टाउन, नरेंद्रनगर, खामला रोड, वर्धा रोड, शिवाजीनगरासह चंद्रपूर आणि यवतमाळसह सर्वच ठिकाणी कारवाई सुरू आहे.
सर्वांत मोठी कारवाई ठरणार
निवासस्थान आणि कार्यालयातून संशयास्पद कागदपत्रे आणि कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क जप्त केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आतापर्यंतची सर्वांत मोठी ही कारवाई ठरण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. राजकीय नेत्यांचे पैसे या बिल्डर्सच्या व्यवहारात गुंतले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT