संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

पुणे-मुंबईत बिल्डर झामची गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः नागपुरात रो-हाउस आणि फ्लॅट विक्रीच्या नावावर हजारो ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा नामांकित बिल्डर हेमंत झाम हा पुण्यात आणि मुंबईत गुंतवणूक करीत होता. त्यासाठी त्याने काही ठिकाणी मोठमोठे भूखंड विकत घेऊन त्यावर फ्लॅट स्कीम बांधण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच आतापर्यंत नागपूरप्रमाणेच पुणे-मुंबईतील ग्राहकांकडूनही पैसे उकळल्याची माहिती समोर येत आहे. बिल्डर झामला गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली, तर रविवारी साथीदार यौवन गंभीर याला अटक केली. त्याला आज न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्याला 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डर हेमंत झामने स्वस्तात फ्लॅट किंवा घर अशी योजना काढली. ग्राहकांना आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. गुंतवणूकदारांमध्ये जास्तीत-जास्त सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याने फ्लॅट स्कीमची मोठी जाहिरातबाजी केली. तसेच वेबसाइट तयार केली. त्यामुळे नागपुरातीलच नव्हे, तर राज्यातून ग्राहकांनी गुंतवणूक केली. हिंगण्यामधील वागधरा येथे कन्हैया सिटी ले-आउट बनवून त्यावर सडक तयार केली होती. त्याने सोमलवाड्यातील पर्यावरणनगरात आलिशान कार्यालय थाटले होते. त्यामुळे ग्राहकांना फसविण्यासाठी कर्मचाऱ्यांची टीम तयार केली होती. त्याच टीमने झाम याला कोट्यधीश बनवले. त्या पैशातून त्याने पुणे आणि मुंबई शहरात गुंतवणूक सुरू केली होती. काही भूखंड विकत घेऊन त्यावरही फ्लॅट स्कीमचे प्रोजेक्‍ट तयार केले होते, अशी माहिती आहे.
ग्राहकांना देत होता "फंडे'
पोलिसांत तक्रार करण्याची तयारी करणाऱ्या ग्राहकांना झाम अनेक "फंडे' देत होता. वाठोड्यातील जमीन दाखवून त्यामधील भूखंड देण्याचे आमिष तर कधी शहरातील मोठ्या स्कीममध्ये फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष देत होता. त्यामुळे अनेकजण त्याच्या भूलथापांना बळी पडत होते.
हॉटेलमध्ये रंगारंग पार्टी
बिल्डर हेमंत झाम नव्या फ्लॅट स्कीमचे उद्‌घाटन करण्यासाठी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये रंगारंग पार्टी देत होता. त्यासाठी लाखो रुपये तो पार्टीवर खर्च करायचा. गुंतवणूकदारांना जेवण आणि मनोरंजनाची व्यवस्था करीत होता. तसेच ताबडतोब बुकिंगवर मोठी सूटही देत होता. तसेच "लकी ड्रॉ' म्हणून एक फ्लॅटही भेट देण्याचे आमिष देत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अभिनेते शेखर सुमन यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT