Buldana Bus Accident  
विदर्भ

Buldana Bus Accident : मृत काळेंच्या कुटुंबांचा शोध घेताना पोलिसही थकले! घरमालकाचाही पत्ता...

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून यात नागपूरचे कौस्तुभ काळे यांचाही समावेश आहे. परंतु काळे यांनी बुकिंगदरम्यान ट्रॅव्हल्स एजंटकडे नोंदविलेला पत्ताच जुना असल्याने हुडकेश्वर पोलिसांनीही हात टेकले.

अपघातातील मृत कौस्तुभ काळे यांनी पुण्याला जाण्यासाठी विदर्भ ट्रॅव्हल्सकडे बुकिंग केले होते. त्यानुसार ते सायंकाळी पावणेपाच वाजता बैद्यनाथ चौकातून ट्रॅव्हल्समध्ये चढले. या बसला रात्री सिंदखेडराजाजवळ भीषण अपघात झाला. यात त्यांचाही मृत्यू झाला.

बुकिंग करतेवेळी त्यांनी बेसा येथील पिपळा रोडवरील स्वामी समर्थनगरी येथील रहिवासी पत्ता दिला. नागपुरातील मृतांमध्ये समावेश असल्याने हुडकेश्वर पोलिसही ट्रॅव्हल एजंटने नोंद केलेल्या पत्त्यावर पोहोचले. पोलिसांनी त्यांच्याबाबत शेजारी असलेल्या घरांमध्ये विचारणा केली. परंतु येथे काळे यांना ओळखणारे फारच कमी लोक आढळून आले.

पोलिसांनी काळे यांच्याबाबत सखोल चौकशी केली असता काळे यांनी अंजली भागवतकर यांचे घर काही वर्षांपूर्वी भाड्याने घेतले होते, ही बाब पुढे आली. मुळात काळे यांनी हे घर सात ते आठ वर्षापूर्वी सोडल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यानंतर कुठे राहायला गेले, याबाबत कुणालाच माहिती नाही.

काळे राहात असतानाही कुणाच्या जास्त संपर्कात नव्हते. त्यामुळे परिसरातील बहुतेक लोकांना ते येथे राहात असल्याचेही माहिती नव्हते. हुडकेश्वर पोलिसांनी संपूर्ण माहिती घेतली. अखेर काळे यांच्या कुटुंबीयाबाबत काहीही माहिती मिळत नसल्याने निराश होऊन पोलिसांनाही रित्या हाताने परतावे लागले.

आधार अपडेट न केल्याने दमछाक

ट्रॅव्हल एजंटकडे प्रवासासाठी नोंदणी करताना काळे यांनी दिलेल्या आधार कार्डच्या झेरॉक्सवर जुनाच पत्ता होता. या आधार कार्डवरील पत्त्यानुसार पोलिसही बेसा येथील स्वामी समर्थनगरी येथे पोहोचले. काळे यांनी कदाचित आधार कार्ड अपडेट केले नसावे किंवा जुन्याच आधार कार्डची झेरॉक्स नोंदणी करता दिली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पोलिसांची दमछाक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT