result 
विदर्भ

दहावी निकाल! अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा अव्वल

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल यंदा 95.14 टक्के लागला. राज्यात अमरावती जिल्हा अनुक्रमे पाचवा आहे. विभागात बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली असून या जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला. अमरावती जिल्हा शेवटच्या स्थानावर आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याने मुलींनी परत एकदा बाजी मारली आहे.

मार्च 2020 ला शालांत माध्यमिक परीक्षेसाठी अमरावती विभागातून 1 लाख 67 हजार 455 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 59 हजार 313 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींची सरासरी मुलांच्या तुलनेत अधिक आहे. 77 हजार 977 पैकी 75 हजार 454 मुली उत्तीर्ण झाल्या असून निकालाची सरासरी 96.76 टक्के आहे.

अमरावती मंडळाचे विभागीय सचिव अनिल पारधी यांनी निकाल जाहीर केला. या वेळी सहसचिव डॉ. जयश्री राऊत, उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे व बुद्धभूषण सोनोने उपस्थित होते.
राज्यात अमरावती विभाग राज्यात पाचव्या क्रमांकावर असून गतवर्षी निकालाची टक्केवारी 71. 98 होती. यंदा निकालाची टक्केवारी तब्बल 24.06 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. विभागातील एकूण 1 लाख 68 हजार 605 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. प्रावीण्यासह प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 56 हजार 341 आहे. प्रथमश्रेणीत 59 हजार 35, द्वितीय 35 हजार 425, तृतीय श्रेणीत 8 हजार 512 विद्यार्थी आहेत. एकूण 1 लाख 59 हजार 313 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

61 विद्यार्थी दोषी
परीक्षेच्या काळात गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या 61 विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यातील सर्व 61 विद्यार्थी दोषी आढळून आले असून त्यांच्यावर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. दोषी आढळलेल्या 61 विद्यार्थ्यांमध्ये अकोला सात, अमरावती 13, बुलडाणा 8, यवतमाळ 14 व सर्वाधिक वाशीमच्या 26 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तीन शाळांचा निकाल शून्य
यवतमाळ जिल्ह्यातील एक व बुलडाणा जिल्ह्यातील दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला असून विभागातील 791 शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे. काठावर पास होणाऱ्या शाळांची संख्या सात आहे.

जिल्हानिहाय निकाल

  • बुलडाणा - 96.10 टक्के
  • वाशीम - 96.09 टक्के
  • अमरावती - 93.94 टक्के
  • अकोला - 95.52 टक्के
  • यवतमाळ - 94.63 टक्के

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT