दारू sakal
विदर्भ

Buldana : अवैध दारू विक्री करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला दंड

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने धाबे दणाणले!

राजेश नागरे

बुलडाणा : विनापरवाना दारू विक्री करणार्‍या ढाबा मालक आणि याठिकाणी दारू पिणार्‍यांना न्यायालयाने दंड ठोठावला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिखली आणि मेहकर परिसरात या कारवाई केल्या आहेत. यात दोन हॉटेलचालक आणि पाच व्यक्तींविरूद्ध कारवाई करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील हॉटेल काकाजी ढाबा, पेठ, ता. चिखली, हॉटेल श्रीयोग, मेहकर फाटा, भालगांव शिवार, ता. चिखली, हॉटेल विघ्नहर्ता, मेहकर फाटा, भानखेड शिवार, ता. चिखली, हॉटेल अन्नदाता, चिखली लोणार रोड, मेहकर, ता. मेहकर या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीत एकुण १४ हजार ५९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यातील सर्वांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ नुसार गुन्हा करण्यात आला. या गुन्ह्यातील व्यक्तींना न्यायदंडाधिकारी एच. डी. देशिंगे यांनी दोन हॉटेल चालकांना प्रत्येकी ४० हजार रूपये, तसेच विना परवाना असलेल्या हॉटेल, ढाब्यावर मद्यसेवन करणार्‍या ५ व्यक्तींना प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे एकुण १ लाख ५ हजार रूपयांचा दंड आकारला.

सरकारी वकील व्ही. एम. परदेसी यांनी कामकाज पाहिले. सदर कार्यवाही चिखलीचे निरीक्षक जी. आर. गावंडे, निरीक्षक किशोर पाटील, आर. आर. उरकुडे, दुय्यम निरीक्षक एस. डी. चव्हाण यांनी केली. गुन्ह्याच्या तपासात दुय्यम निरीक्षक ए. आर. आडळकर, आर. ई. सोनुने, जी. व्ही. पहाडे, एन. ए. देशमुख, एस. डी. जाधव, एस. अवचार, एस. बी निकाळजे, ए. एम. सोळंकी, ए. पी. तिवाने, पी. ई चव्हाण वाहनचालक आर. ए. कुसळकर, एम. एस. जाधव आणि व्ही. पी. पाटील यांनी सहाकार्य केले.

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैरित्या हॉटेल, ढाब्यामध्ये दारु विक्री करणार्‍या तसेच मद्यसेवन करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

अवैध पद्धतीने दारु बनविणे, दारुचे वाहतूक करणे असे प्रकार घडत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास सुचना देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamilnadu Government: तामिळनाडूमध्ये AI साठी स्वतंत्र मंत्रालय! खातेवाटप जाहीर, मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

Appa Mahadik Anandrao Patil : महादेवराव महाडिकांनी आनंदराव पाटलांचा अपमान केला होता का?; महाडिक गटाकडून खुलासा; गोकुळवरून राजकारण तापलं

Manoj Jarange: मराठा आंदोलनाला नवे वळण! मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ? निकटवर्तीयाविरोधात ED आणि आयकर विभागाकडे तक्रार

यूपी निवडणुकीसाठी कॉकरोच जनता पार्टीला पहिला उमेदवार मिळाला; थेट मुस्लिम आमदारांनी CJP मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला

IPL 2026 : "हार्दिक पांड्यामुळे Mumbai Indians मधील वातावरण बिघडलं, रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवण्याची गरज..."

SCROLL FOR NEXT