Pradhan Mantri Awas Yojana sakal
विदर्भ

बुलडाणा : प्रधानमंत्री आवास योजना करतेय कर्जबाजारी

लाभार्थ्यांना हप्ता मिळाला नसल्यामुळे कर्ज, उसनवारीची चिंता

सकाळ वृत्तसेवा

लोणार : सर्वसामान्य नागरिकांना घर असे स्वप्न दाखविणार्‍या शासनाच्या दिरंगाईचा फटका गरीब लाभार्थ्यांना बसत असून, असलेले तोडून नसलेल्याच्या मागे लागत तेही अर्धवट झाल्यामुळे तूर्तास सर्वच लाभार्थी मेटाकुटीला आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची आता कर्ज डोईजड झाली असून, थांबलेले हप्ते आतातरी शासनाने द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागात लोणार नगरपरिषद अंतर्गत योजना राबविण्यात आली. परंतु, आता प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ही लाभार्थ्यांसाठी कर्जबाजारी करणारी ठरत आहे. २०१९- २०२० मध्ये पहिल्या टप्प्यात एकूण ६० लाभार्थ्यांना मंजुरात मिळाली होती. त्यातील दहा लाभार्थ्यांनी काम पूर्ण केले. परंतु, आज जवळपास दोन वर्ष होत असताना सुद्धा लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा दुसरा टप्प्यातील ९० हजाराचा लाभ आजपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे लाभार्थी पुरते हैराण झाले आहे.

सदर लाभार्थ्यांनी २०२० मध्ये पावसाळ्या अगोदर राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे काही प्रमाणात कर्ज काढून काम पूर्ण केले व तसा कागदोपत्री पाठपुरावा संबंधित विभागाकडे केला. तरीसुद्धा जवळपास दोन वर्षे उलटून सुद्धा हप्त्याची रक्कम मिळाली नाही. एकंदरीत महागाईमुळे बांधकामाचे सर्व साहित्य जवळपास दुपटीने महागल्यामुळे व वेळेवर अनुदान न मिळाल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

लाभापेक्षा आता कर्जफेडीची चिंता

दुसर्‍या टप्प्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी रामदास गबाजी मापारी हे म्हणाले, पूर्वीचे मातीचे कच्चे घर बरे होते. प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान मिळण्याच्या आशेने घर बांधून कर्जबाजारी झालो. कर्जाच्या चिंतेने रात्री झोप लागत नाही. त्यामुळे लवकरात लवकर हप्ता देण्यात यावा.

हप्त्यासंदर्भात माहिती घेण्यात येईल

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या हप्त्याविषयी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. वटकर यांच्याशी संपर्क केला असता, याबाबत संपूर्ण माहिती घेऊन कळवतो असे सांगितले. त्यांनी सुद्धा नुकताच नगरपरिषदेचा पदभार घेतला असल्यामुळे सहाजिकच याबाबत माहिती नसावी.

कर्जामुळे लाभार्थी त्रस्त

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधून मिळण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळणार म्हणून आनंद होता परंतु, आता आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आम्ही मोलमजुरी करून गेल्या दोन वर्षापासून सदर रकमेचे व्याज भरत असल्याचे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी दत्तात्रय महादु पवार व लक्ष्मीबाई आसाराम खुळे यांनी सांगितले. हीच परिस्थिती दुसर्‍या टप्प्यातील लाभार्थ्यांची आहे. २६ जुलै २०२१ ला ज्या लाभार्थ्यांनी कामास सुरवात केली त्यांची सुद्धा हप्त्याअभावी रखडलेली आहे. ४ महिन्यात ज्या लाभार्थ्यांनी ७० टक्के काम पूर्ण केले. त्या लाभार्थ्यांना देखील आज पर्यंत पहिल्या टप्प्यातील एक रुपयाही अनुदान मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT