Buldana rumor: petrol pump will be shut down 
विदर्भ

बुलडाणा येथे वेगळीच अफवा, पेट्रोल पंप होणार बंद

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : कोरोना व्हायरस प्रभाव पाहता टप्याटप्याने प्रशासन उपाययोजना करत आहे. गर्दी कमी करण्यासाठी आठवडी बाजार, यात्रा व देवदर्शन पूर्वीच केले आहे. मात्र, जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर आज (ता.१९) रात्री १२ नंतर कुठल्याही वाहनाला इंधन मिळणार नाही अशी अफवा पसरली. त्यामुळे कधी नव्हे ते बुलडाणा व मोताळा येथे इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अशी कुठलीच अधिसूचना काढली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. बोरखेडी पोलिसांनी पेट्रोल पंपावर भेट देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे यावेळी आवाहन केले. 

अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यात गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी 'नो गॅदरींग'चा आदेश असला तरी जिल्ह्यातील पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले आहेत, असा कुठलाही आदेश जिल्हा प्रशासनाने काढलेला नाही. ती एक निव्वळ अफवा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोलपंप कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून बंद ठेवण्यात आले असल्याची अफवा सध्या जिल्ह्यात फिरत आहे. असा कुठलाही आदेश जिल्हा प्रशासनाने काढलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ही आवाहन त्यांनी केले आहे.

पेट्रोल पंप सुरूच
जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याबाबत कुठलेही आदेश काढण्यात आले नाहीत. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याबाबत अफवा पसरवली जात आहे. या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल पंप बंद असणार नाहीत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT