buldhana bus accident Sakal
विदर्भ

Buldhana Bus Accident : ‘अम्मी जा रही हू’...! जोयाचे 'ते' शब्द अखेरचेच; तिच्यावरच होती घराची जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : संपूर्ण घर सांभाळून नोकरी करीत कुंटुंबाचे अर्थचक्र तिच्यावर होते. काल दुपारी जेव्हा पुण्याला इव्हेंटच्या कामासाठी ती घरातून जायला निघाली, तेव्हा निघताना तिने आई हुस्‍नारा बेगम हिला ‘अम्मी जा रही हू’ असे म्हटले. मात्र, नियतीने घात केला. मध्यरात्री दीड वाजता ट्रॅव्‍हल्सला झालेल्या अपघातात जोया उर्फ गुडीया जमालुद्दीन शेख (वय २७) हिचा मृत्यू झाला. जाताना तिने म्हटलेले शब्द अखेरचे ठरले.

ताजबाग येथील निराला सोसायटीजवळ असलेल्या प्यारेखान यांच्या घरी भाड्याने हुस्‍नारा बेगम आपल्या तीन मुलांसह राहतात. त्यात मोठा मुलगा अजहरुद्दी शेख (वय ३१), जोया उर्फ गुडीया आणि जाकीरुद्दीन (वय २४) या भावाबहिणीचा समावेश आहे. वडिलांचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला.

वडिलांचे छत्र हरपल्याने तिन्ही मुलांचे शिक्षण सुटले. त्यातल्या त्यात जोया ही बारावीपर्यंत शिकली. त्याचा फायदा घेत, तिने इव्हेंट कंपनीत नोकरी सुरू केली. मोठा भाऊ हा डिशटीव्हीचे काम करीत असून लहान भाऊ टाईल्सच्या ठेकेदारासोबत मजुराचे काम करतो.

त्यामुळे घरच्या किराण्यापासून तर आई आणि भावांच्या कपड्यापर्यंतची जबाबदारी तिचीच होती. प्रत्येकवेळी इव्हेंटसाठी ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची. दहा दिवसांपूर्वी ती उत्तरप्रदेशातून इव्हेंटचे काम करून घरी परतली होती. त्यानंतर काल तिला पुण्यात इव्हेंटच्या कामासाठी जायचे होते.

त्यासाठी तिने आदल्या दिवशी तयारी केली. शुक्रवारी (ता.३०) नमाज अदा करीत, ‘अम्मी जा रही हू’ असे म्हणत, तिने दुपारी तीन वाजता दोन्ही भावासह बैद्यनाथ चौक गाठले. तिथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या गाडीचे तिकीट घेत, पुण्याचा प्रवास सुरू केला.

आज सकाळी मोठ्या भावाच्या मुलगा सुलतान याने तिच्याबद्दल माहिती देताच, कुटुबातील सदस्यांना धक्का बसला. त्यातून परिवारात शोककळा पसरली. तिच्या मृत्यूच्या धक्क्याने लहान भावाचा आधार तर मोठ्या भावाची ‘गुडीया’ या जगात नव्हती. दुसरीकडे अझरुद्दीनही बुलढाण्याच्या दिशेने निघाला होता.

ईदी न देताच गेली बहिण

ईद मोठा सण असल्याने या सणाच्या निमित्ताने घरातील छोट्यांना ‘ईदी’ देत, शुभेच्छा दिल्या जातात. जोयापेक्षा वयाने लहान असलेला जाकीरुद्दीन तिच्या आठवणी सांगताना गहिवरला होता. बहिण या जगात नाही, हे त्याला कळल्यावर आता ईदी कोण देणार यावेळी ईदी न देताच, जोया निघून गेली असे म्हणत तो हुंदके देत होता.

विशेष म्हणजे, आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शेख कुटुंबिय हलाखीचे जीवन जगत होते. दहा दिवसांपूर्वी जोया इव्हेंटवरुन घरी आली. मात्र, तिलाही पैसे मिळाले नसल्याने, घरात २९ तारखेला ईद हा सण साजरा करता आला नाही.

आई अनभिज्ञच

पोटची पोरगी जोया हिचा समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला अपघात होत, तिने पेट घेतल्याने त्यात जळून मृत्यू झाला. ही बाब भावांना कळल्यावर ते सुन्न झाले. मात्र, ही बाब आई हुस्‍नारा बेगम यांना अद्यापही कळविली नसल्याची माहिती लहान भाऊ झाकीरुद्दीन याने दिली. तिला कळल्यास सांभाळणे मुश्‍किल होईल म्हणून अपघात झाल्याने मोठा भाऊ सांभाळण्यासाठी गेल्याचे तिला सांगितल्याचे तो म्हणाला.

पोलिसांचीही दमछाक

जोया हिच्या आधार कार्डवर पांढराबोडी येथील पत्ता असल्याने अंबाझरी पोलिस त्याचा शोध घेत, तिच्या घरी पोहचले. मात्र, जोया आणि त्यांचे कुटुंब दहा वर्षांपूर्वीच, ताजबाग परिसरातील निराला सोसायटीतील पेट्रोलपंपाजवळ भाड्याने राहण्यास गेल्याचे कळले. यातून सक्करदरा पोलिसांनी माहिती दिल्यावर त्यांनी घरचा शोध घेत, कुटुंबियांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT