Sanjay Bahale and Manisha Bahale sakal
विदर्भ

Buldhana Bus Accident : मृतात कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील काका-पुतणीचा समावेश

मध्यरात्री समृध्दी हायवेवर विदर्भ ट्रॅव्हल्सला सिंदखेडराजा नजिक अपघात होऊन बसने पेट घेतल्याने आतील प्रवाशांचा जळून मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

कारंजा - मध्यरात्री समृध्दी हायवेवर विदर्भ ट्रॅव्हल्सला सिंदखेडराजा नजिक अपघात होऊन बसने पेट घेतल्याने आतील प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. यामध्ये शिवनगर ता. कारंजा येथील चुलत्या-पुतणीचा समावेश असल्याचे बुलढाणा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीवरुन स्पष्ट झाले आहे.

प्रसिद्ध झालेल्या मृतांच्या यादीत समाविष्ट संजय बहाळे व मनिषा विजय बहाळे कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील रहिवासी आहेत. शहरापासून पाच किमी अंतरावरील शिवनगर येथील धनगरवाडा हॉटेलचे मालक संजय बहाळे (वय -४७) व त्यांची पुतणी मनिषा विजय बहाळे (वय-२१) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कारंजा वरुन पुणे येथे जाण्यासाठी हॉटेल न्यू राधाकृष्ण नवीन बायपास येथून विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये बसले होते असा प्राथमिक अंदाज आहे.

सुरुवातीपासून अभ्यासात हुशार असलेल्या मनिषाला एमपीएससी परीक्षेची तयारी करायची असल्याने पुणे येथे शिकवणी लावण्याकरिता काकाला सोबत घेऊन ते या बसने निघाल्याचे कळते. परंतू मधेच काळाने त्यांच्यावर घाला घातला व सर्व काही क्षणात संपून गेले.

अपघातानंतर आग लागलेल्या बस मधून बाहेर न पडता आल्याने, दोघांचाही आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मृतांच्या प्रसिद्ध यादीतून व नातेवाईकांकडून प्राप्त होत आहे. एकाच कुटुंबातील दोन जीव गेल्याने शिवनगर गावावर शोककळा पसरली आहे. सुस्वभावी व उत्कृष्ट कबड्डीपट्टू संजय बहाळे यांचे अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे नातलग, मित्रमंडळी व ग्रामस्थ घटनेची माहिती मिळताच बुलढाणा येथे गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT