crime esakal
विदर्भ

Buldhana Crime : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी चार वर्षे कारावास!

अल्पवयीन मुलीचा विनयभंग व छेडछाडी प्रकरणी आरोपी संदीप गणेश तायडे (वय-३०) जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सकाळ वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग व छेडछाडी प्रकरणी आरोपी संदीप गणेश तायडे (वय-३०) जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

बुलडाणा - एका नऊ वर्ष चार महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग व छेडछाडी प्रकरणी आरोपी संदीप गणेश तायडे (वय-३०) जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल आज ता. १ रोजी देण्यात आला.

घटने संदर्भात हकीगत अशी की, 22 ऑक्टोबर 2018 सकाळी दहा वाजता शाळेत जाण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी आपल्या भावासोबत घराच्या ओट्यावर बसली होती. त्यावेळी संदीप तायडे याने त्याठिकाणी येऊन भावाला दुकानावर पाठविले व मुलीला पकडून तिच्यासोबत छेडछाड केली.

सदरबाब तीने आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आई, वडील व चुलत भाऊ हे संदीपला समजावण्यासाठी घरी गेले असता त्याने शिवीगाळ करून पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार मुलीच्या आईने चिखली पोलिसात दाखल केली होती. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला व प्रकरण न्यायालयात सादर करण्यात आले.

फिर्यादी पक्षातर्फे पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यामध्ये पीडीतेच्या आई स्वतः पिडिता यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी बाजू मांडली. दंडाच्या रकमेतून एक हजार पाचशे रुपये ही रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याबाबत निकालात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT