Buldhana  Sakal
विदर्भ

Buldhana : कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करू नका

संभाजी ब्रिगेडची निवेदनातून मागणी

सकाळ वृत्तसेवा

मोताळा: शून्य ते वीस पटसंख्या असणार्‍या शाळा बंद केल्यास अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून कायमचे दूर लोटले जातील. त्यामुळे सदर शाळा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोताळा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना गुरुवारी (ता. १३) निवेदनातून करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन समोर जे मांडले होते. छ्त्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात ज्याची अंमबजावणी केली होती. तेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मांडले असून, आरटीई क्ट २००९ नुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काची तरतूद आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले आहे.

त्यानुसार वस्ती, पाडे, तांडे, वाड्या अशा दुर्गम भागात शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी झाले आहे. कमी विद्यार्थी संख्या असणार्‍या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी, वस्ती, तांडे व आदिवासी बहुल क्षेत्रात अधिक आहेत. या शाळा बंद झाल्यास येथील मुलांच्या व विशेषतः मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते शैक्षणिक प्रवाहापासून कायमचे दूर लोटले जातील. काही आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. गाव, वस्तीच्या बाजूला नद्या नाले असल्यामुळे पावसाळ्यात या भागाचा अनेक दिवस संपर्क तुटतो.

त्यामुळे या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून विद्यार्थी संख्येअभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षक भरती करण्यात यावी. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून टाकण्यात यावी. पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात याव्या, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, गणेश बोराळे, निलेश सोनोने, प्रमोद मापारी, गजानन वाघ, गोपाल शेळके यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT