Gangadhar tayade sakal
विदर्भ

Farmer Kidney Selling : शेतकऱ्याने मागितली स्वत:ची किडनी विकण्याची परवानगी

पलढग येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने राज्यपालांना निवेदन देऊन स्वतःची किडनी विकण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बुल़डाणा - निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्याचा व्यवसाय होत आहे. अशातच पलढग येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने राज्यपालांना निवेदन देऊन स्वतःची किडनी विकण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

बुलडाणा तालुक्यातील पलढग (पोस्ट कोथळी) येथील गंगाधर बळीराम तायडे यांनी ही मागणी केली आहे. जेमतेम १ हेक्टर ६० आर शेत त्यांच्याकडे आहे. ज्ञानगंगा अभयारण्याला लागून शेत असल्याने वन्यप्राणी पिकांची नासाडी करतात. पिके वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करून राखण करावी लागते.

यातून वाचली तर कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी गारपीट तर कधी पिकांवर रोगराई ठरलेली. यातून हाती आलेल्या पिकांना कवडीमोल भाव मिळतो, अशी व्यथा त्यांनी सांगितली.यातून लागवडी खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नाही. मग पीक कर्ज कसे फेडणार, असा त्यांनी सवाल केला.

पीक कर्ज अल्प असल्याने खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे घेऊन शेती केली. मात्र, काहीही पिकवा तोटा ठरलेला, अशी मागील चार वर्षांपासूनची स्थिती. बँक व सावकाराचे तगादे सुरूच असल्याने नेहमी अपमान सहन करावा लागतो. या दुष्टचक्रामुळे कर्जबाजारीपणात भर पडत चालली.

आत्महत्येचे विचार मनात येतात, पण मन धजावत नाही, असे त्यांनी सांगितले. आत्महत्या केली तर घरच्यांना सरकार पैसे देईल, पण मी एकमेव कर्ता पुरुष असल्याने घरचे उघड्यावर पडतील. लेकरांना बाप मिळणार नाही. त्यामुळे एकतर गांज्याची शेती करू द्या अथवा किडनी विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT