कबड्डी सामन्यात वाद; दगडफेक व दुचाकींची तोडफोड
कबड्डी सामन्यात वाद; दगडफेक व दुचाकींची तोडफोड 
विदर्भ

कबड्डी सामन्यात वाद; दगडफेक व दुचाकींची तोडफोड

सकाळवृत्तसेवा

खामगाव (बुलडाणा): कबड्डी सामन्यांत वाद होवून दोन गट आमने सामने आले, तुफान दगडफेक करत जवळपास १० दुचाकींची तोडफोड करण्यात आली. बुधवारी (ता. 21) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

खामगाव येथील शिवाजी नगर भागात कबड्डी सामने सुरू आहेत. बुधवारी रात्री सतीफैल मधील श्री हनुमान संघ व शिवाजी नगर भागातील तानाजी संघ यांच्यात कबड्डीचा सामना खेळला गेला. या समान्या दरम्यान दोन गटात शाब्दिक वाद होवून हाणामारी झाली. यावेळी दगडफेक करण्यात आली.जवळपास १० दुचाकींची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राम मिश्रा यांच्यासह काही जण जखमी झाले आहेत. रात्री वेळीच पोलिस व दंगाकाबू पथक पोहचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आमदार ऍड. आकाश फुंडकर यांनी सुद्धा नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलिसांनी मनप्रित चव्हाण, बलजीत चव्हाण यांच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाजी नगर भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT