lightning sakal
विदर्भ

Sheep Died Lightning : साखळी येथे वीज पडून सोळा मेंढ्या दगावल्या

शेतात बसलेल्या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने १६ मेंढ्या दगावल्या. तर ४० जखमी झाल्या

सकाळ वृत्तसेवा

शेतात बसलेल्या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने १६ मेंढ्या दगावल्या. तर ४० जखमी झाल्या.

बुलडाणा, तालुक्यातील साखळी बु. शिवारात ६ मार्चच्या पहाटे दोन सुमारास अवकाळी तडाखा बसला. यावेळी वीज पडल्याने दोन मेंढपाळांवर आर्थिक संकट कोसळले. एका शेतात बसलेल्या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने १६ मेंढ्या दगावल्या. तर ४० जखमी झाल्या.

साखळी बुद्रुक शिवारात भिका लोखंडे यांच्या शेतात विजय अंबादास सुसर व विजय माधव बोराडे यांनी मेंढ्या बसविल्या होत्या. त्यांच्याकडे दोनशे मेंढ्या होत्या. ५ मार्चला दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर त्या शेतात जाळीचे कुंपन घालून बसवण्यात आल्या. दरम्यान, ६ मार्चला पहाटे दोन ते अडीच वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. एक वीज कोसळल्याने १६ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ४० मेंढ्या जखमी झाल्या.

मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांमध्ये विजय सुसर यांच्या ७ आणि विजय बोराडे यांच्या मालकीच्या ९ मेंढ्यांचा समावेश आहे. तसेच विजय सुसर यांच्या २० व विजय बोराडे यांच्या २० मेंढ्या जखमी झाल्या. या घटनेमुळे मेंढपाळांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तलाठ्यांनी सकाळी ९ वाजता पंचनामा केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT