buldhana van dam water storage rise due to rain monsoon weather forecast Sakal
विदर्भ

Buldana Water Storage : सातपुड्यातील वाण’ प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ

buldana latest news in marathi | सातपुड्यातील पावसामुळे वाण प्रकल्पात पाण्याची आवक वाढू लागली.

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर : खारपाण पट्ट्यातील शेकडो गावांची तहान भागवणाऱ्या ‘वाण’ प्रकल्पात यंदा जल साठा वाढलेला नसल्याने चिंतेचा सूर उमटू लागला होता. मात्र, मागील २४ तासात या प्रकल्पात आवक होऊ लागली असून पाणीसाठा वाढीला लागला आहे. बुधवारी (ता.२४) सकाळपर्यंत या प्रकल्पात २६.६६ टक्के साठा होता. एक दिवसापुर्वीच हा साठा २५ टक्क्यांवर येऊन ठेपला होता.

बुलडाणा, अकोला जिल्हयाच्या सीमेवर वारी हनुमान येथे असलेल्या या ‘वाण’ प्रकल्पामुळे खारपाण पट्ट्यातील गावांना पिण्यासाठी गोड्या पाण्याची उपलब्धता तयार झालेली आहे. विविध पाणी पुरवठा योजना या प्रकल्पावर अवलंबून आहेत. शिवाय रब्बी, उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीसुद्धा मिळत असते.

जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असला तरी पुरेशा पाऊस वाण प्रकल्प क्षेत्रात झालेला नसल्याने चिंता वाढली होती. दररोज प्रकल्पातील साठा कमी व्हायला लागला होता. गेल्या २४ तासात या भागात जोरदार पाऊस होत आहे. मध्यप्रदेशात, सातपुड्यातील पावसामुळे वाण प्रकल्पात पाण्याची आवक वाढू लागली.

मागील २४ तासात बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर, शेगाव, नांदुरा, मोताळा, खामगाव तालुक्यांमध्ये पाऊस झाला. जळगाव जामोद तालुक्यात ४१, संग्रामपूर ३३.४, खामगाव १८.७, शेगाव ३१.३, मलकापूर २६.७, मोताळा १५.२, नांदुरा १७.६ मिलिमीटर पाऊस पडला. बुधवारीसुद्धा पाऊस सुरु असून आता या प्रकल्पात पाणीसाठा वाढेल अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT