चिंचाळा (जि. यवतमाळ) : येथील जळून खाक झालेला गोठा. 
विदर्भ

वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?

सुमीत हेपट

मारेगाव (जि. यवतमाळ) : नुकताच पोळा साजरा झाला. शेतकऱ्यांनी आपल्या दैवत असलेल्या बैलाची मनोभावे पूजा केली. कारण हेच बैल त्याच्या शेतीची मशागत करण्यास उपयोगी पडते. मारेगाव तालुक्यातील चिंचाळ्यात एका गोठ्याला आग लागली अन् त्या आगीत बैलाचा होरपळून मृत्यू झाला.

याशिवाय शेतीपयोगी अवजारांसह अनेक साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आगीची घटना शनिवारी (ता. २९) सकाळी सहाच्या दरम्यान उघडकीस आली.

लोभेश्वर गोसाई खोले व संतोष गोसाई खोले (दोन्ही रा. चिंचाळा) असे आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. लोभेश्वर व संतोष खोले यांची मारेगाव तालुक्‍यातील चिंचाळा शिवारात दहा एकर शेत जमीन आहे.

बैल वेसण तोडून घरी आला

प्राप्त माहितीनुसार, आज शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास या शेतकऱ्याचा एक बैल वेसण तोडून घरी परत आला. त्यामुळे शेतकऱ्याने लगेच आपल्या शेताकडे धाव घेतली असता, शेतामधील गोठ्याला आग लागून संपूर्ण गोठाच खाक झाल्याचे आढळून आले. या आगीत एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला, तर एक बैल गंभीरावस्थेत भाजून जखमी झाला आहे.

आगीत तीन लाखांचे नुकसान

या गोठ्यात असलेले १६ बॅग रासायनिक खत, बी-बियाणे, कीटकनाशकांची फवारणी करणारे यंत्र, विविध शेतीमशागतीची साधने, पाइप, कुटार, टिनपत्रे आदी शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे या आगीत शेतकऱ्याचे अंदाजित तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

8th Pay Commission : खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार तब्बल ३३८ टक्क्यांपर्यंत वाढ, जाणून घ्या संपूर्ण अपडेट

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

एक्सप्रेस वेवर एक्झिट चुकले, पुढे युटर्न ऐवजी रिव्हर्स घेतली कार; मागून स्कॉर्पिओची धडक, कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT