नागपूर : चौकातील अतिक्रमण जेसीबीद्वारे अशाप्रकारे हटविण्यात आले.
नागपूर : चौकातील अतिक्रमण जेसीबीद्वारे अशाप्रकारे हटविण्यात आले. 
विदर्भ

म्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर

सकाळवृत्तसेवा

नागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत गुरुवारी महापालिका व नासुप्रला निर्देश दिले होते. मनपा, नासुप्रने पोलिस ताफ्यासह कारवाई करीत म्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला.
म्हाळगीनगर चौकातील रिंगरोडवरून वाहनांची कायम गर्दी असते. त्यात चिकन विक्रेत्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीची कोंडी केली. त्यामुळे या वर्दळीच्या चौकातून ये-जा करणाऱ्यांवर अपघाताची कायम टांगती तलवार होती. याशिवाय येथे गुंडगिरीलाही ऊत आला होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिका, नासुप्रकडे तक्रार केली. परंतु, त्याबाबत कुठलीही दखल घेतली जात नव्हती. अखेर नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली. नागरिकांच्या मागणीवरून पालकमंत्र्यांनी चिकनची दुकाने हटविण्याचे निर्देश मनपा व नासुप्रच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासचे पथक पोलिस ताफ्यासह म्हाळगीनगर चौकात पोहोचले. यावेळी काही दुकानदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस ताफ्यापुढे त्यांनी नमते घेतले. त्यानंतर चिकन सेंटरचे शेड, पिंजरे आदी जप्त करीत पथकाने अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला.
कारवाईत नासुप्रचे दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी अविनाश बडगे, सहायक अभियंता संदीप राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक विनोद कुमार खळगे, क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील, महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व इत्तर अधिकारी तसेच हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतरच महापालिका व नासुप्रला जाग आली, अशी टीकाही यावेळी नागरिकांनी पथकावर केली. काल पालकमंत्र्यांनी म्हाळगीनगर भागातील सत्यम प्लाझा या इमारतीच्या बेसमेटमध्ये घाण करणाऱ्या हॉटेलवर कारवाईचे तसेच अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: '...काहीही झालं तरी मी माझं पद', स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेच्या राजीनाम्याबाबत केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update : आरोपी विशाल अग्रवालच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना शिवीगाळ, दमदाटी

Nashik News : सिन्नरमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा कुंदेवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार; स्फोटानंतर खासदार शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT