petrol 
विदर्भ

एकतर्फी प्रेमातून युवतीला जाळण्याचा प्रयत्न, वाचा आणि डोळ्यांना गंभीर दुखापत, युवती कृत्रिम श्‍वसनयंत्रणेवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिंगणघाटमधील नंदूरी चौकात विक्‍की नगराळे नावाच्या युवकाने प्राध्यापक युवतीवर पेट्रोल फेकून जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. गंभीर जखमी युवतीवर नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. विक्‍कीला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली असून ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याची चर्चा आहे.

सविस्तर वाचा - वर्ध्यात चक्‍क शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 24 वर्षीय तरूणी ही एका महिला महाविद्यालयात बॉटनी विषयाची प्राध्यापिका आहे. ती आणि आरोपी विक्‍की नगराळे एकाच गावाचे रहिवासी आहेत. त्यामुळे दोघांची ओळख आहे. आज सोमवारी सकाळी सात वाजता ती बसने हिंगणघाटला पोहचली. नंदुरी चौकातून जात असताना मागून दुचाकीने विक्‍की नगराळे एका मित्रासह आला. त्याने पीडितेशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने बोलण्यास नकार दिला. काही क्षणातच विक्‍कीने दुचाकीच्या डिक्‍कीतील बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर टाकले आणि पेटता कापडाचा टेंभा तिच्या अंगावर फेकला. पीडितेच्या अंगावरील कपड्याने लगेच पेट घेतला. तिचा चेहरा, केस, डोळे आणि छातीसह अन्य अवयव गंभीररित्या जळाले. प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत तिला विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला लगेच नागपुरातील ऑरेंज सीटी हॉस्पिटलला दाखल केले. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली.

आरोपीला कठोर शिक्षा मिळावी
विक्‍की हा आमच्याच गावातील असून तो आम्हाला ओळखतो. तो गेल्या काही दिवसांपासून तो माझ्या मुलीच्या मागे फिरत होता बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे विक्‍कीने चिडून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले आहे. या कृत्यामुळे आम्ही हादरलो आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी आम्ही करतो.
पीडित मुलीचे वडील.

नातेवाईकांचे बयाण घेणे सुरू
आज सोमवारी सकाळच्या सुमारास नंदूरी चौकात विक्‍की नावाच्या युवकाने प्राध्यापक युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्या युवतीला पोलिसांनी ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तिच्या नातेवाईकांचे बयाण घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रमेश्‍वर आगासे, पोलिस उपनिरीक्षक, हिंगणघाट पोलिस.

युवतीची प्रकृती चिंताजनक
सकाळी साडेनऊ वाजता ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक युवतीला गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत दाखल करण्यात आले. तिच्यावर लगेच प्राथमिक उपचार सुरू केले. ती जवळपास 30 ते 40 जळाली आहे. तिच्या फुफुफसाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला श्‍वासोश्‍वास घेण्यास त्रास होत आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिच्या चेहरा जवळपास पूर्णपणे जळाला आहे. इन्हेलेशनल इंज्यूरी असल्यामुळे तिच्या जीवाला मोठा धोका आहे. धोक्‍याबाहेर येण्यास पेशंटला तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल. तिला वाचविण्यासाठी डॉक्‍टरांची मोठी चमू चोवीस तास कार्यरत आहे. चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यामुळे सौंदर्य परत येणे कठीण आहे. तिच्या डोळ्यात पेट्रोल गेल्यामुळे डोळ्याला दृष्टि आहे की नाही, हे सांगणे कठिण आहे. तिची वाचा गेली आहे, त्यामुळे ती तृर्तास बोलूसुद्धा शकत नाही. येत्या 72 तासांपर्यंत तिच्यावर शर्थीचे उपचार आम्ही करीत आहोत.
डॉ. दर्शन रेवनवार  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: युती ठरली, पण महायुतीचे राजकारण पुन्हा उघडे; 122 जागांवर एकमत, मनसे 50–55 जागा लढवणार

Pune Water Issue : वारजे मुख्य जलवाहिनीत गळती; चांदणी चौक, बाणेर-बालेवाडी परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत!

Ohh Shit: रोहित शर्मा मॅच खेळत होता अन् 'तो' अचानक कोसळला; तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पळापळ झाली अन् सर्वच घाबरले

New Year Trip Places : कमी खर्चात नव्या वर्षाची ट्रीप प्लॅन करताय? 'ही' आहेत 5 बेस्ट ठिकाणे..कमी पैशात डबल मजा

Latest Marathi News Live Update : बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणातील लुथरा ब्रदर्स यांच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT