burning car
burning car 
विदर्भ

Video : तहसीलदार तलाठ्यासह गेले गस्तीवर अन् घरासमोर घडली ही भयानक घटना...

सकाळ वृत्तसेवा

घाटंजी (जि. यवतमाळ) : तहसीलदार पूजा माटोडे यांच्या किरायाच्या घरासमोर असलेले चार चाकी वाहन अज्ञात इसमाने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविले. सदर घटना काल मध्यरात्री घडली. या प्रकरणात रेती माफियांचा हात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.


अंबानगरी येथील तहसिलदार पूजा माटोडे यांच्या घरासमोर तिन चार चाकी वाहने उभी होती. त्यापैकी तलाठी पवन बोडें यांच्या वाहन क्रं. MH 32 Y o539 ह्या गाडीवर पेट्रोल टाकून ते वाहन अज्ञात व्यक्‍तीने पेटवून दिले. सदर घटना घडली तेव्हा तहसीलदार व चमू रेती तस्काराच्या मागावर होते. ही संधी साधून आरोपींनी हे कृत्य केले.


पेट्रोलिंगवर असताना तहसीलदार पूजा माटोडे यांना घटनेची माहिती फोनद्वारे मिळताच त्यांची चमू घटनास्थळी आली. तोपर्यंत गाडीचा समोरचा भाग जळून खाक झाला होता. सी. सी. टीव्ही फुटेज पाहिले असता दोन इसम गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवितानां दिसून आले. रात्री एक वाजून पंधरा मिनिटाची ही घटना असल्याचे सीसी टीव्हीत नमुद आहे.

26 तारखेला रात्री 11 वाजेच्या दरम्यान तहसिलदारांचे ड्रायव्हर गीरी यांना अज्ञात इसमाने फोन करून मॅडम कोठे आहे असा प्रश्न्न विचारला. मी पत्रकार नखाते बोलतो असे सांगून फोन बंद केला. आरोपीने चक्क पत्रकाराच्या नावाचा गैरवापर केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सूड घेण्याचा  प्रकार
यापूर्वीही रेती माफीयाचे हल्ले झालेले आहेत. त्यांची दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. अवैध रेती वाहतुकीबाबत चोरीची रेती व गाड्या यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याचा सूड घेण्याचा हा प्रकार असल्याचे तलाठी बोडें यांनी सांगितले. वृत्त लिहीपर्यंत पोलिस आणि तहसीलदार यांच्या प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकल्या नाहीत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT