butterfly.j 
विदर्भ

कशी आहे फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनीया?

रूपेश खैरी

वर्धा : फुलपाखरांशी दोस्ती होते ती बालपणीच. कळायला लागल्यापासुनच फुलपाखरांचे रंगीबेरंगी रंग भुरळ घालतात. आणि या फुलावरुन त्या फुलावर बागडणाऱ्या फुलपाखरामागे पळण्याचा छंदच जडतो. फुलपाखरांच्या या रंगीबेरंगी दुनीयेचा वेध घेण्याचा मानस असलेल्या बहार संस्थेकडून सप्टेंबर हा फुलपाखरांचा महिना म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जात आहे.

याअंतर्गत १४ ते २० सप्टेंबर दरम्यान फुलपाखरांची महागणना आयोजित करण्यात आली. बहार नेचर फाउंडेशनद्वारे रविवारी सेवाग्राम रेल्वेस्थानक ते चितोडा रोड या दरम्यान असलेल्या अधिवासात ही फुलपाखररू गणना करण्यात आली. यावेळी छोटा चांदवा, बहुरूपी, चट्‌टेरी भटक्‍या, कवडशा, अविस्मरणीय, त्रुणपिलाती, निलभिरभिरी, निलय, कवडा, लघुत्रुणपिलाती, पट्‌टेरी रुईकर, सांजपरी अशी विविध प्रकारची फुलपाखरे अभ्यासकांना आढळून आली.

प्रत्येक फुलपाखरू एका किंवा अनेक मात्र विशिष्ट वनस्पतीवरच अंडी घालतात. या वनस्पती अंड्‌यातून बाहेर पडणाऱ्या सुरवंटाच्या खाद्यवनस्पती असतात. त्याला होस्ट प्लांट असे म्हटले जाते. त्यामुळे एखाद्या अधिवासात जेवढ्‌या जास्तीत जास्त प्रकारच्या खाद्यवनस्पती असतील तितक्‍या अधिक प्रमाणात फुलपाखरांचे प्रकार पहावयास मिळतात, याची जाणीव ठेवून गणनेदरम्यान होस्ट प्लांट असलेले रोपटे लावून निसर्गप्रेमींनी फुलपाखरोत्सव साजरा केला.

बहारने यापूर्वी जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांची सूची प्रकाशित केलेली आहे. फुलपाखरांच्या सखोल व अभ्यासपूर्ण नोंदी घेऊन जिल्ह्यात आढळणाऱ्या फुलपाखरांची सूची तयार केली जाणार आहे. वर्षभराच्या निरीक्षणानंतर येत्या वर्षात ही सूची प्रकाशित केली जाईल.

या फुलपाखरू गणनेत बहारचे अभ्यासक प्रा. किशोर वानखडे, दिलीप वीरखडे, जयंत सबाने, वैभव देशमुख, दर्शन दुधाने सहभागी झाले होते.

फुलपाखरू उद्यान निर्मितीचा मानस
फुलपाखरांच्या रंगीबेरंगी दुनियेसोबतच त्यांची माहिती आणि महत्त्व सर्वापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वर्धा शहरालगत फुलपाखरू उद्यानाची निर्मिती करण्याचा बहारचा मानस आहे. फुलपाखरू उद्यानास पोषक अधिवासाचा शोध घेऊन उद्यान निर्मितीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाईल.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT