home akola.jpg 
विदर्भ

या व्यवहारांना लागले कोरोनाचे ग्रहण!

सुगत खाडे

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे संकट घोंघावत आहे. या संकटामुळे प्रत्येक क्षेत्रावर विपरित परिणाम झाला आहे. व्यापारीवर्गासह सामान्य नागरिक सुद्धा कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. अनेक उद्योग, व्यापारांना डंख मारणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना सुद्धा शिकार केले आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना सुद्धा फटका बसला आहे. परिणामी नोटबंदीनंतर सर्वाधिक झळ बसलेल्या या व्यवहारांवर यावेळी कोरोनाचे ग्रहण लागल्याने शासनाच्या महसूलाचे सुद्धा नुकसान होत आहे. 

राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये व त्यातील स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार दस्त नोंदणी ३० मार्च रोजीच्या आदेशान्वये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. मालमत्ता-खरेदी विक्री करताना बायोमॅट्रीक पद्धतीचा वापर होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता लक्षात घेता मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर बंदी लावण्यात आली होती. दरम्यान 19 एप्रिलच्या आदेशान्वये संचारबंदीतून काही बाबी वगळण्यात आल्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्रांक शुल्क विषयक व्यवहार ऑनलाईन प्रणालीद्वारे (दस्त नोंदणी) पूर्ववत सुरु करण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रत्येक तालुक्यातील एक व अकोला शहरातील तीन असे नऊ कार्यालय असल्यानंतर सुद्धा खरेदी-विक्रीचे व्यवहारांना कोरोनाचे ग्रहण लागले आहे. 

अडीच हजारांची नोंदणी संख्या दीडशेवर
जिल्ह्यात एका महिन्याला साधारणतः अडीच हजार दस्त नोंदणीचे व्यवहार होतात. परंतु कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार 20 एप्रिलपर्यंत बंद होते. गत आठ दिवसांपासून व्यवहार सुरु झाल्यानंतर सुद्धा केवळ 153 व्यवहारांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या महसूलावर सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. 

56 लाख शासनाच्या तिजोरीत
20 एप्रिलपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील 9 दस्त नोंदणीच्या कार्यालयात 153 व्यवहारांची नोंद झाली. त्यापासून मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कापासून शासनाच्या तिजोरीत 56 लाख 50 हजार 465 रुपयांचा महसूल सुद्धा जमा करण्यात आला. समान्य परिस्थितीत खरेदी-विक्रीच्या व्यवहारापासून जवळपास 7 कोटी रुपये महिन्याला शासनाच्या तिजोरीत जमा होतात. परंतु यावेळेस या व्यवहारांना कोरोनाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. 

आठ दिवसांत 56 लाखांचा महसूल जमा
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात सुद्धा जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये करारनामा व खरेदीपत्रांच्या नोंदणीचे व्यवहार सुरु आहेत. त्यामुळे गत आठ दिवसांत शासनाच्या तिजोरीत 56 लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. कोरोनाचे संकट टळल्यानंतर व्यवहारात वाढ होण्याची शक्यता आहे. 
- दिलीप भोसले
सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग-१, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT