File photo 
विदर्भ

गणेशोत्सवात पुलांवर नाचता येणार नाही

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गणरायाच्या आगमनाला आणि निरोप देताना उड्डाणपुलांवर नाचण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. वाजतगाजत नाचताना अपघात होऊ नये याकरिता पोलिस आणि मनपाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. लवकरच पुलावर नाचण्यास बंदीचा आदेश काढण्यात येईल.
सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणरायाचे आगमन धडाक्‍यात केले जाते. बॅंडपथक, डीजेच्या गजरात निरोपही दिला जातो. मिरवणुकीत कार्यकर्ते उत्साहात असतात. कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतो. गणरायाचा जयघोष आणि डीजे, संदलवर नाचण्यात प्रत्येक जण मश्‍गूल असतो. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शहराच्या सर्वच भागांत आता उड्डाणपुलांचे जाळे निर्माण झाले आहे. यात पाऊस असल्यास अधिकच धोका वाढतो. याचे खापर सुरक्षा यंत्रणेवर येते. त्यामुळे मिरवणुकीसाठी उड्डाण पूल बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे.
शहरात नऊशेपेक्षा अधिक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली जाते. दर वर्षी यात भर पडते. शहरात नव्या पुलांची निर्मिती झाली आहे. असे असले तरी पाचपावली, अजनी रेल्वे, इटारसी पूल जुने झाले आहेत. अजनी पुलाचे आयुष्य संपले आहे. पाचपावली पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. वाहन गेले तरी हलल्याचा भास होतो. त्याची क्षमताही आत पूर्वीइतकी राहिली नाही. मिरवणुकीत एकाच वेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी होतात. मोठमोठ्या मूर्तींची ट्रकवर मिरवणूक काढली जाते. त्यामुळे अतिरिक्त भार पुलावर येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT