file photo 
विदर्भ

क्षुल्लक कारणावरून कारच्या काचा फोडल्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या कारच्या काचा फोडल्याची घटना बजाजनगर चौकातील फॉर्म हाउस किचनसमोर घडली. राजकीय पक्षातील चर्चेत असलेल्या नेत्याच्या मुलाने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बजाजनगर पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमणीनगर येथे राहणारा प्रमोद राजेंद्र कांबळे (29) हा फॉर्म हाउस किचनमध्ये मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीसाठी आला होता. त्याने हॉटेलसमोर मालकाची एमएच 14 ईयू 5373 क्रमांकाची मर्सडिज उभी केली होती. याच हॉटेलमध्ये राजकीय पक्षाच्या नेत्याचा मुलगा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी आला होता. धक्का लागल्याच्या कारणावरून प्रमोद व नगरसेविकेच्या मुलामध्ये वाद झाला. या वादावादीनंतर रात्री 1.50च्या सुमारास प्रमोद हॉटेलमधून बाहेर आला. कारमध्ये बसून तो बजाजनगरकडून काचीपुऱ्याकडे येत होता. यावेळी नगरसेविकेच्या मुलाने व मित्रांनी प्रमोदची कार अडविली व कारमधून बाहेर खेचले. त्यानंतर कारच्या दोन्ही बाजूकडील काचा फोडल्या. तसेच प्रमोदला हातबुक्कीने मारहाण केली. प्रमोदच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT