mla dr. namdev usendi and dr. nitin kodvate sakal
विदर्भ

Crime News : आचारसंहित भंग प्रकरणी भाजपच्या दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी व डॉ. नितीन कोडवते यांच्या विरोधात स्थानिक गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य, वर्तनासंदर्भात खोटी माहिती असलेली पत्रके गडचिरोली येथील राजेश कॉम्प्युटर्स यांच्याकडे छापून माहिती प्रसिद्ध केल्या प्रकरणी निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी व डॉ. नितीन कोडवते यांच्या विरोधात स्थानिक गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे रहिवासीच नाहीत अशी खोटी माहिती असलेली पत्रके प्रकाशित करून प्रसारीत करण्यात आली होती. यासंदर्भात डॉ. नामदेव किरसान यांनी निवडणुक अधिकारी यांच्याकडे कारवाई करण्यासंदर्भात तक्रार अर्ज सादर केला होता.

हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आचार संहिता पथकाने प्रकरणाची चौकशी करून हा प्रकार खरा असल्याचे निष्पन्न होताच नायब तहसीलदारांमार्फत गडचिरोली शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यावरून आचारसंहितेचा भंग झाला म्हणून निवडणुकीपूर्वी भाजपावासी झालेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी व डॉ. नितीन कोंडवते यांच्याविरुद्ध बुधवार (ता. २४) गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक तथा ठाणेदार अरुण फेगडे यांनी दिली.

डॉ. उसेंडी व डॉ. कोडवते यांच्याविरुद्ध भादंवि १७१(ग ) (१)सह कलम लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ ते कलम १२३(४) उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मार्गोनवार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : जावई पहिल्यांदाच सासुरवाडीला गेला, सासरच्यांनी बनवले तब्बल १३०० हून अधिक खाद्यपदार्थ, बनला चर्चेचा विषय; व्हिडिओ व्हायरल

Zodiac Remedies: आज मौनी अमावस्येच्या दिवशी, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा अन् पूर्वजांना करा प्रसन्न

Mumbai Mayor: शिंदे गटातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार? मुंबईत काय चाललंय? महापौरपदासाठी गूढ वाढलं

BMC Election: मानखुर्दमध्ये ‘एमआयएम’ सरस; मुस्लिम मतदारांचा राजकीय कल बदलल्याचे चित्र, अपेक्षेहून अधिक यश!

RAC बंद, सेकंड क्लासला किमान ५० किमी तर स्लीपर क्लाससाठी २०० किमीचे भाडे द्यावंच लागेल; रेल्वेचे नवे नियम

SCROLL FOR NEXT