file
file 
विदर्भ

वाघाने पाडला गाय-गोऱ्ह्याचा फडशा

सकाळ वृत्तसेवा

उमरेड (जि.नागपूर) ः उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या आसपासच्या गावांमध्ये नेहमीच वन्यजीवांचा वावर असतो. कधी कुणाच्या पिकांची नासाडी, कधी कुणावर हल्ला, तर कधी कुणाच्या जनावरांवर हल्ला झाल्याच्या घटना अधूनमधून नेहमीच कानावर येतात. अशातच तालुक्‍यातील तारणा शिवारातील शेतातील खळ्यावर बांधून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांवर हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची घटना मंगळवारी (ता. 10) सकाळी उघडकीस आली.

नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
तारणा गावातील रहिवासी शेतकरी आनंदराव तुळशीराम पडोळे (वय 65) यांचे सहा एकर शेत गावालगत जंगलाच्या वेशीला लागून आहे. त्यात गहू, हिरवी मिरची व हरभरा पीक घेतले जाते. सोमवारी रात्रीच्या सुमारास वाघाने शेतात प्रवेश करून शेतात बांधून ठेवलेल्या गाय व गोऱ्ह्यावर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. अंदाजे 40 हजारांचे नुकसान झाल्याचे पडोळे यांनी सांगितले. वारंवार वनजीवांचा शिरकाव वाढत असल्याने शेती करणे अवघड होत आहे. पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते. शेतकऱ्यांना पशुहानीसुद्धा सहन करावी लागते. हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांच्या शेजारीच बैलजोडी बांधलेली होती. सुदैवाने वाघाने त्यांच्यावर हल्ला केला नाही. त्यामुळे मोठी हानी टळली. अन्यथा आमचे खूप मोठे नुकसान झाले असते, असेही पडोळे म्हणाले. वन विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.

तारणा येथे बिबट्याने केल्या दोन गायी ठार
कुही ः तालुक्‍यातील तारणा येथे सोमवारी रात्री बिबट्याने गावात येऊन दोन गायी ठार केल्याची घटना घडली. आनंदराव पडोळे असे गायींच्या मालकाचे नाव आहे. माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. तालुक्‍यात वाघ शिरल्यामुळे जनावरांवर हल्ला होण्याच्या घटना वाढीस लागल्यामुळे शेतक-यांमध्ये दहशत पसरली आहे. वन विभागाने वाघांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT