गोंदिया : रॅलीत सहभागी झालेले ओबीसी बांधव. 
विदर्भ

जनगणनेत स्वतंत्र रकाना हवा; गोंदियात घुमला ओबीसींचा आवाज

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : या अभियानाचा बुधवारी (ता. 19) शिवाजी महाराज जयंतीदिनी येथील जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर समारोप झाला. या वेळी केंद्र सरकारने जनगणनेत स्वतंत्र रकाना करावा, अन्यथा बहिष्कार टाकला जाईल, असा सूर हजारो ओबीसी बांधवांमधून उमटला.

ओबीसी सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघ गोंदिया जिल्हाप्रणित ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने ओबीसी जनगणना जागृती अभियान 5 फेब्रुवारीपासून अर्जुनी मोरगाव येथून सुरू करण्यात आले.

जिल्ह्याच्या आठही तालुक्‍यांतील घराघरांत या अभियानाची जनजागृती केल्यानंतर बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी या अभियानाचा समारोप करण्यात आला.

रॅलीचे सभेत रूपांतर

समारोपीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे, प्रदीप ढोबळे, बबलू कटरे, अमर वराडे, खेमेंद्र कटरे, राधेलाल पटले, संदीप तिडके, सुनील तरोणे, पुरुषोत्तम मोदी, एस. सी. वंजारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी, नवे पर्व-ओबीसी सर्व, ओबीसींची स्वतंत्र जनगणना झालीच पाहिजे, अशा गगणभेदी घोषणा देत हजारो ओबीसी बांधवांनी दुपारी 12 च्या सुमारास दुचाकी, चारचाकी वाहनांची रॅली काढली. ही रॅली जयस्तंभ चौकात पोहोचताच नवीन प्रशासकीय इमारतीसमोर सभेत रूपांतर झाले. या सभेत मान्यवरांनी केंद्र सरकारच्या ओबीसीविरोधी भूमिकेवर कडाडून हल्ला केला.

...तर जनगणनेवर बहिष्कार

सन 2021 च्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना करण्यात यावा, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी करीत हे शक्‍य नसेल तर, जनगणनेवर आपला बहिष्कार राहील. प्रगणकाला सहकार्य केले जाणार नाही, अशी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली. या समारोपीय कार्यक्रमात जिल्हाभरातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जनजागृती अभियानातील काही मुद्दे

ओबीसींचा स्वतंत्र जातिनिहाय रकाना असल्यासच प्रगणकाला माहिती द्या, अन्यथा माहिती देऊन नका, त्याला परत पाठवा, बहिष्कार घाला, ओबीसींच्या सहकार्याशिवाय देशातील कोणतेही सरकार टिकू शकत नाही, राबणारे व या देशाचा खजाना भरणारे आम्हीच आहोत. जनगणनेवर बहिष्कार घातल्यास इतर सोयींवर याचा कोणताच परिणाम होत नाही (उदा. रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, घरकुल, बीपीएल), धमक्‍यांना घाबरू नका, आपले हक्क मिळविण्यासाठी लढा, असे मुद्दे अभियानात मांडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोनालिसा अल्पवयीन? व्हायरल गर्लच्या जन्मतारखेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

IND vs WI 3rd ODI: भारतीय संघात अचानक बदल, CSK च्या स्टार खेळाडूला बोलावलं; तिसऱ्या वन डेत Playing XI मध्ये बदल निश्चित

Supreme Court: फटाके फोडण्यावर सरसकट बंदी नाही; वेळेचे बंधन पाळणे आवश्‍यक असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट

बुध-राहूच्या नक्षत्र संयोगामुळे या ६ राशींचं नशीब फळफळणार; करिअर, व्यवसाय आणि धनलाभासाठी पुढील १२ दिवस ठरणार खास

Latest Marathi News Live Update : कन्नड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट; हातातोंडाशी आलेली खरीपाची पिके डोळ्यांसमोर जळून खाक

SCROLL FOR NEXT