central government review team will visit to nagpur on 24 december 
विदर्भ

पूरपरिस्थितीला दोन महिने लोटल्यानंतर केंद्रीय पथक २४ला विदर्भात, आता कशाची करणार पाहणी?

नीलेश डोये

नागपूर : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यानंतर २४ डिसेंबरला केंद्राचे पथक नागपूर जिल्ह्यात येणार आहे. सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर कशाची पाहणी करणार आणि मदत कशी मिळणार? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

हेही वाचा -

ऑक्टोबर महिन्यात नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. शेजारच्या मध्य प्रदेशातील नद्या आणि धरणे तुडुंब भरल्याने मोठ्या प्रमाणास पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील नदी आणि धरणाच्या शेजारची अनेक गावे व शेतजमीन पाण्याखाली बुडाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यात लाखो हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले. राज्य सरकारने पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत दिली. परंतु, ती अतिशय तोकडी असल्याने सरकारला नागरिकांच्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. राज्याचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला.

मुख्यमंत्री, मुख्यसचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाने अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु, केंद्रशासन दखल घेत नव्हते. तसा आरोपही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार केला होता. त्यानंतर आता केंद्राकडून नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर ओसरताच नागरिकांना, शेतकऱ्यांना खऱ्या मदतीची गरज होते. मात्र, त्यावेळी राज्य शासनाकडून मिळालेल्या तोकड्या निधीमध्ये का  होईना नागरिकांनी पुरामध्ये पडलेल्या घरांची डागडुजी केली आहे. तसेच शेतजमिनीला कसण्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे केंद्रीय पथक आल्यानंतर त्यांना सर्व काही सुरळीतच दिसणार आहे. त्यामुळे आता दोन महिन्यानंतर येऊन कशाची पाहणी करणार असल्याचा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

दोन गटात विभागणी -
२४ डिसेंबरला पथक येणार असून नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याची नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी करतील. पथकाची दोन गटात विभागणी होणार असून यातील एक गट २४ला नागपूर व २५ला भंडारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील, तर दुसरा गटातील अधिकारी २४ ला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची पाहणी करतील. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

...तोपर्यंत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, बाळ्या मामांचा सरकारला इशारा, नेमकी अट कोणती?

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Yermala Crime : राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या वाहन लुटीच्या व्हायरल व्हिडीओ नंतर, स्थानिक गुन्हे शाखेला जाग

SCROLL FOR NEXT