गडचिरोली : बैठकीला उपस्थित असलेले ग्रामस्थ.  
विदर्भ

कोरोनामुक्तीसाठी चंदनवेली, येनगाववासींनी केली तंबाखूबंदी...इतर गावांनीही घ्यावा या गावांचा आदर्श

खुशाल ठाकरे

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली व धानोरा तालुक्‍यातील येनगाव येथील गाव संघटनेतर्फे तंबाखूविक्री बंदीचा निर्णय नुकताच घेण्यात आला. दोन्ही गावांमध्ये पार पडलेल्या बैठकींमध्ये 'कोरोनामुक्तीसाठी तंबाखूविक्रीवर बंदी' असा गावाने ठराव घेतला आहे. गाव तंबाखूमुक्त करण्याचा निश्‍चय केला आहे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा गावात शिरकाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गाव ठेवण्यासाठी दोन्ही गावांतील नागरिकांनी तंबाखूमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या विषाणूचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी वर्षभरासाठी पानठेले व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी चंदनवेली, येनगाव येथे गाव संघटनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

थुंकीमुळे पसरतो कोरोना

यावेळी कोरोना विषाणूचा शिरकाव ग्रामीण भागातसुद्धा झाला असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळले पाहिजे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे गावामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात दोन्ही गावांतील बैठकींमध्ये चर्चा करण्यात आली.

ठरावावर नागिरकांच्या स्वाक्षऱ्या

'साथरोग नियंत्रण कायदा १८९७' व 'सुगंधित तंबाखूविक्री बंदी कायदा' यानुसार संपूर्ण राज्यात तंबाखू व सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी असणे गरजेचे आहे. मात्र, कायद्यांचे उल्लंघन करीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच आहे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्‍यता असल्यामुळे तंबाखू विक्रीवर बंदी घालणे महत्त्वाचे आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच दोन्ही गावांतील नागरिकांनी ठरावावर स्वाक्षऱ्या करून गाव कोरोनामुक्त व तंबाखूमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

साखरेचा सडवा केला नष्ट

भामरागड तालुक्‍यातील कोसफुंडी गावापासून ४ किमी अंतरावर असलेल्या शेतशिवारात दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेने धाड टाकून जवळपास तीन मडक्‍यांत असलेला साखरेचा सडवा नष्ट केला. तसेच दारूविक्रेत्याला पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी व समज देण्यात आली. कोसफुंडी हे गाव दारूमुक्त आहे. मात्र गावापासून दूर वास्त्यव्यास असलेल्या एका व्यक्तीने छुप्या मार्गाने शेतशिवारात दारूभट्टी सुरू केली होती.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur President’s Rule Ends: वर्षभरानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात ; युमनाम खेमचंद सिंह घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!

U19 World Cup: भारताविरुद्ध सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या दोघांची शतकं, विक्रमही नावावर अन् संघाच्या ३०० धावाही पार...

Rise of Online Education : भारतातील ऑनलाईन शिक्षणाचा उदय : एमबीए आणि काम करणाऱ्या  व्यवसायिकांसाठीचा नेमका अर्थ 

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपावर भाजपचे वर्चस्व! हिमगौरी आहेर-आडके यांचा अर्ज दाखल, पण 'ठाकरे' गटाच्या एन्ट्रीने लढत होणार

Latest Marathi News Live Update : गोरेगावमध्ये लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसचे फुगे, मोठा अपघात टळला

SCROLL FOR NEXT