File photo
File photo 
विदर्भ

...म्हणून मिळाला चंद्रकला चक्रवर्तीला उद्यानपंडित पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा

पारशिवनी (जि नागपूर ) : फळबागेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या बळावर, जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करत असताना कृषी सहायक आर. जी. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हा कृषी क्षेत्राचा गौरव करणारा उद्यानपंडित पुरस्कार मिळाला असल्याचे चंद्रकला चक्रवर्ती यांनी सांगितले. 
नुकताच महाराष्ट्र शासनाच्यावतीने कृषी विभागाचा उद्यानपंडित पुरस्कार पारशिवनी तालुक्‍यातील अदिवासीबहुल बच्छेरा येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकला रेवाराम चक्रवर्ती यांना जाहीर झाला. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. सदर पूरस्कार त्यांनी कृषी विभागामार्फत केलेली संत्रा फळबाग लागवड, नाईक (कृषी साह्ययक) यांच्या मार्गदर्शनामुळे संत्रा फळ झाडांना कृषी विभागामार्फत उभारलेल्या गांडूळ खत प्रकल्पातून दशपर्णी अर्कचा वापर डिक्‍या निर्मूलनासाठी बोर्डोमिश्रणाचा वापर संत्र्याची विक्री व व्यवस्थापनामुळे मागील तीन वर्षांत घेतलेल्या उत्पादनाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 
पंचवीस हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह हे या पुरस्काराचे स्वरूप आहे, यापूर्वी त्याच्या कार्याची दखल शेतकरी मासिक, ऍग्रोवनसारख्या शेतीविषयक दैनिकांनी त्यांची दखल घेतली होती. यापूर्वी त्यांना 2018 मध्ये वसंतराव नाईक मानव विकास संशोधन सस्था (वन्हार्टी ) नागपूरच्या वतीने हरित क्रांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्या या पुरस्कारात मोलाचा वाटा आर. जी. नाईक (कृषी सहायक- नवेगाव खैरी), एस. आर. ठाकरे (कृषी पर्यवेक्षक), जी. बी. वाघ (तालुका कृषी अधिकारी पारशिवनी) यांचे असून त्याबदल चक्रवर्ती यांनी त्याचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT