chandrapur corporation appoint 7 teams for crowded areas  
विदर्भ

नागरिकांनो सावधान! गर्दी करू नका; तुमच्यावर आहे 'त्यांची' नजर; होणार कारवाई  

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : लसीकरण आणि नियमांमध्ये मिळालेल्या शिथिलतेमुळे कोरोनाविषयक बेफिकीर वृत्ती दिसून येत आहे. कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी. नियमांचे पालन न करणाऱ्या मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड ठोठवावा, प्रसंगी सील करण्याची कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले आहेत. त्यासोबतच गर्दीच्या ठिकाणावर पाळत ठेवण्यासाठी सात पथके गठित करण्यात आले आहेत.

शहरात विविध ठिकाणच्या नाश्‍ता पॉइंटवर सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. भाजीविक्रेते, प्रतिष्ठाने येथेही मास्क न घालणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे, असे प्रकार वाढले आहेत. बेफिकीरीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करणे गरजेचे झाले आहे. मनपाने गठित केलेल्या सात पथकांद्वारे आता गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मार्केट परिसरात मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. टेस्टिंग वाढविण्यावर भर द्यावा. कंटेनमेंट झोन करण्याची गरज पडली, तर पोलिस विभागाच्या साहाय्याने करण्याची तयारी ठेवावी. होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर भर देण्याचे तसेच लसीकरण मोहीमेची गती वाढविण्याचेही निर्देश याप्रसंगी दिले.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन शासनाच्या नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत. त्याचे कठोरतेने पालन करण्याचे आदेश आयुक्त मोहिते यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT