विनयभंग  Sakal
विदर्भ

किराणा घेण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलीचा दुकानदाराकडून विनयभंग

आरोपी किराणा दुकान व्यावसायिकाविरुद्ध विनयभंग आणि पास्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : राजुरा तालुक्यातील रामपूर- सहकार नगर येथील येथील एका किराणा दुकानदाराने दुकानात किराणा घेण्यासाठी आलेल्या एका बारा वर्षीय मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी किराणा दुकान व्यावसायिकाविरुद्ध विनयभंग आणि पास्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा पोलिसांनी पन्नास वर्षीय आरोपीला अटक केली आहे. (Vidarbha Crime News)

सास्ती टाऊनशिपच्या बाजूला रस्त्यावर राधेश्याम किराणा दुकान आहे. या दुकानात शेजारच्या रामपूर, सहकार नगर येथील नागरिक किराणा व अन्य आवश्यक वस्तू घेण्यास येत असतात. आज सकाळी नऊ वाजता एक अल्पवयीन मुलगी वही आणण्यासाठी दुकानात आली होती. राधेश्याम नामक दुकानदाराने मुलीला वही पाहण्यासाठी दुकानाच्या आत बोलावून तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडून तिला छातीवर भार देत कवटाळले.

यामुळे मुलगी घाबरून रडायला लागली. तेव्हा त्याने तिला चॉकलेट देऊन सोडले. या मुलीने घरी रडत येऊन आपल्या आईला घटनेची माहिती दिली. या घटनेची तक्रार या अल्पवयीन मुलीच्या आईने राजुरा पोलीस ठाण्यात केली. तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विनयभंग कलम 354 ए (1) आणि बालकांचे लैंगिक अपराधा पासून सुरक्षा संरक्षण अधिनियम 2012 यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपी किराणा व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली. दरम्यान यामुळे या भागात या दुकानदारांविरुद्ध मोठा रोष निर्माण झाला. दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद राहणार?

Thane News: भाईंदर-ठाणे प्रवास होणार वेगवान! कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ट्रॅफिक जामला ब्रेक मिळणार, कसा असेल मार्ग?

Ketan Agrawal Murder Case: सिया गोयलच्या वकीलपत्रासाठी दोन वकिलांमध्ये पेटला वाद! अ‍ॅड. विपूल दुशिंग यांचं म्हणणं काय?

Latest Marathi News Live Update: पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत आदेश

Marriage Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांना बायकोच्या रूपात मिळते लक्ष्मी; पतीच्या यशामागे असतो फक्त तिचाच हात

SCROLL FOR NEXT