tiger attack
tiger attack  sakal media
विदर्भ

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; शेतात आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी चंद्रपूर : आमराई नदीच्या घाटावर बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. त्याच्या शरीराचे लचके तोडत शेतात नेऊन सोडले. मृत शेतकऱ्याचे नाव कवडू किसन मेश्राम (वय ५५, रा. बोडधा) असे आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) उघडकीस आली.बोडधा येथे रविवारी विवाहसोहळा होता. त्यासाठी कवडू किसन मेश्रामही गेले होते. लग्न आटोपून ते घरी परतले. त्यानंतर दुपारी बैल घेऊन ते अमराई नदीघाटावर गेले. सायंकाळी बैल घरी परत आले; मात्र कवडू मेश्राम हे रात्र होऊनही घरी परत आले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी अमराई घाटावर शोधाशोध केली. मात्र, त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.

सोमवारी पुन्हा गावकऱ्यांनी वैनगंगा नदीकाठावर शोधमोहीम सुरू केली. तेव्हा वैनगंगा नदीघाटाला लागून असलेल्या बंडू पाटील ठाकरे यांच्या शेतात मेश्राम यांचा मृतदेह आढळला. दरम्यान, या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे, ठाणेदार रोशन यादव, बोडधा येथील सरपंच मनीषा झोडगे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष धनराज पाटील ठाकरे, मेंडकी पोलिस चौकीचे प्रकाश कावळे दाखल झाले.

मोहफूल, तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम

शेतीचा हंगाम आता संपला आहे. हाताला कामे नाही. त्यामुळे अनेक जण मोहफुले वेचण्यासाठी जंगलात जातात. अनेक जण तेंदूपत्ता संकलनही करतात. हळदा, बोडधा, मुडझा या गावांत वाघांचा वावर वाढला आहे. यापूर्वी वाघाने अनेकांवर हल्ले केले. यात काहीचा बळी गेला, तर काही जण जखमी झाले. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी विनोद झोडगे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT